ETV Bharat / state

'स्मार्ट सिटी की डार्क सिटी'; सोलापुरात युवक काँग्रेसचं मशाल पेटवा आंदोलन - Youth Congress's torch movement

स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतरही सोलापूरकरांचे हाल संपलेले नाहीत. शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रयोग फसलाय.

युवक काँग्रेसचं मशाल पेटवा आंदोलन
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:09 AM IST

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला केंद्रात भाजपची बहुमताने सत्ता आल्यावर काही मह्त्वपुर्ण योजनांची घोषणा केली होती. स्मार्टसिटी ही पण त्यापैकीच एक घोषणा होती. या योजनेत राज्यातील सोलापूरचाही समावेश करण्यात आला होता. स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतरही सोलापूरकरांचे हाल संपलेले नाहीत. शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रयोग फसलाय. त्यामुळे युवक काँग्रेसच्यावतीने आज शहरात मशाल मोर्चा काढून भाजपच्या केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेतील कारभाराचा निषेध करण्यात आला.

स्मार्ट सिटी की डार्क सिटी; युवक काँग्रेसचं मशाल पेटवा आंदोलन

मोठा गजावाजा करून सोलापुरातील सोडियम वेपरचे दिवे बदलून एलईडी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेंव्हा सोलापूरकरांना वाटले आता संपूर्ण शहर प्रकाशमान होईल परंतु, हे एलईडी दिवे बदलण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. ज्या ठिकाणी एलईडी दिवे बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या बहुतांश ठिकाणचे एलईडी दिवे सध्या बंद आहेत. याच मुद्द्यावरून युवक काँग्रेसने पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यावेळी आयुक्तांनी बंद असलेले एलईडी दिवे तत्काळ चालू करण्याचे आश्वासन दिले होते. पण याबाबत कोणतेही कारवाई झाल्याचे दिसून आली नाही. याचा निषेध म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज सोलापुरातल्या जुना एम्प्लॉयमेंट चौकातील व्हीआयपी रोडवर मशाली पेटवून निषेध करण्यात आला.

Intro:सोलापूर : स्मार्ट सिटीत समावेश झाल्याणानंतरही सोलापूरकरांचे हाल संपलेले नाहीत.शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रयोग फसलाय.त्यामुळं युवक काँग्रेसच्यावतीने आज मशाल मोर्चा काढत भाजप केंद्र, राज्य आणि मनपा अशा कारभाराचा निषेध करण्यात आला.
Body:मोठा गजावाजा करून सोलापुरातील सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.तेंव्हा सोलापूरकरांना वाटले आता संपूर्ण शहर प्रकाशमान होईल परंतु हे एलईडी दिवे बदलण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे.ज्या ठिकाणी एलईडी दिवे बदलण्याचे काम झाले बहुतांश ठिकाणचे एलईडी दिवे बंद आहेत.याच मुद्द्यावरून युवक काँग्रेसनं पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.त्यावेळी आयुक्तांनी बंद असलेले एलईडी दिवे तात्काळ चालू करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावर याबाबत कोणतेही कारवाई झाल्याचे दिसून आली नाही याचा निषेध म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज सोलापुरातल्या जुना एम्प्लॉयमेंट चौकातील व्हीआयपी रोडवर मशाली पेटवून निषेध करण्यात आला.

Conclusion:यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर युवक अध्यक्ष विवेक कन्ना, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, सचिन गुंड, सुभाष वाघमारे, शाहू सलगर, राजेंद्र शिरकूल, प्रवीण कदम, सौरभ साळुंखे, अभिषेक गायकवाड, यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.