ETV Bharat / state

दुभत्या जनावरांचा विचार करुन त्यांना तरी चारा द्या..! पशुपालक आजीची सरकारला विणवणी - visit

दुभत्या जनावरांचे वासरू जेंव्हा आईच्या कासेला येऊन चिकटते, तेव्हा कासेत दूधच नसते. मग ते पिणार काय? अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंतही या आजीबाईनी पवारांसमोर व्यक्त केली.

पशुपालक आजीची सरकारला विणवणी
author img

By

Published : May 1, 2019, 1:48 PM IST

सोलापूर - दुभत्या जनावरांचा विचार करून तरी सरकारने चारा द्यावा, अशी भावनिक विणवणी सांगोला तालुक्यातील मंगवडे येथील आजीबाईने सरकारला केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगोल्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील जनतेच्या गाठीभेठी घेतल्या असता, जनावरांसाठी चिंतित झालेल्या आजीबाईंनी पवारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

पशुपालक आजीची सरकारला विणवणी

दुभत्या जनावरांचे वासरू जेंव्हा आईच्या कासेला येऊन चिकटते, तेव्हा कासेत दूधच नसते. मग ते पिणार काय? अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंतही या आजीबाईनी पवारांसमोर व्यक्त केली आहे.

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. मागील अनेक दिवसापासून जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी असताना देखील सरकारने तब्बल सहा महिन्याचा वेळकाढूपणा केला. आता पंधरा दिवसापूर्वी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये सुद्धा दुभत्या जनावरांना देण्यात येणारा १५ किलो चारा हा खूपच कमी असून दुभत्या जनावरांचा विचार करून तरी सरकारने चारा द्यावा, अशी भावनिक साद मंगवडे येथील आजीबाईने शरद पवार यांच्यासमोर घातली.

खासदार शरद पवार यांनी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी सांगोला व मंगळवेढा तालुक्याचा दौरा आयोजित केला होता. यावेळी शरद पवार यांनी मंगेवाडी गावातील चारा छावणीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी चारा छावणीत जनावरे घेऊन आलेल्या आजीबाईने दुष्काळाची परिस्थिती पवार यांच्यासमोर मांडली.

दुभत्या जनावरांना फक्त १५ किलो चारा देण्यात येत असल्यामुळे पाच लिटर दूध देणारी जनावरे ही आता दोन लिटरवर आली आहेत. एवढ्या मोठ्या जनावराला सरकार फक्त पंधरा किलो चारा आणि ४०० ग्रॅम पेंड देत आहे. दुभत्या जनावराला हा चारा खूपच कमी असून सरकारने दुभत्या जनावरांचा विचार करून चारा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

६५० शेततळी असलेल्या अजनाळे गावात दुष्काळाच्या झळा
दुष्काळाची दाहकता लक्षात आल्यानंतर या गावातील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत त्यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी या गावाला फळबागांसाठी प्रोत्साहन दिले. गावातील तरुण शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड करून कोट्यावधी रुपये कमवले जे शेतकरी १९७२ ला रोजगार हमीच्या कामावर गेली होती त्यात शेतकऱ्यांची आता टोलेजंग बंगला उभारले आहेत. या गावातील गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटल्यामुळेच अजनाळे गावात तब्बल ६५० शेततळी आहेत, मात्र आताच्या भयावह दुष्काळामध्ये एकाही शेततळ्यात थेंबही पाणी शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील दुष्काळाची भयानक दिसून येते दुष्काळी परिस्थिती पाहून राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारला दुष्काळाची जाणीव करून देण्यात येईल अशी माहिती ती शरद पवार यांनी यावेळी दिली.

Intro:R_MH_SOL_01_01_CHARA_NEED_FOR_ANIMAL_S_PAWAR
दुभत्या जनावरांचा विचार करुन तरी चारा द्या-
पशुपालक आजीची भावनिक साद,
5 लिटर दुध देणारी दुभती जनावरे 2 लिटर वर आली
सोलापूर-
दुभत्या जनावरांचा विचार करून तरी सरकारने चारा द्यावा अशी भावनिक साद सांगोला तालुक्यातील मंगवडे येथील आजीबाईने घातली आहे . दुभत्या जनावराला लहान वासरे येतात त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारा चारा हा दुभत्या जनावरांसाठी कमी पडत आहे. दुभत्या जनावरांचे वासरू जेव्हा आईच्या कासेला येऊन चीकटत तेव्हा कासेत दूधच नसल्यामुळे दूध काय पिणार अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे अशी खंतही या आजीबाई ने शरद पवारांच्या समोर व्यक्त केली.

Body:सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची चटके मोठ्या प्रमाणावर बसत आहेत मागील अनेक दिवसापासून जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी असताना देखील सरकारने तब्बल सहा महिन्याचा वेळकाढूपणा केला आणि आता पंधरा दिवसापूर्वी चारा छावण्या सुरू केल्या आहेत या चारा छावण्यांमध्ये सुद्धा दुभत्या जनावरांना देण्यात येणारा 15 किलो चारा हा खूपच कमी असून दुभत्या जनावरांचा विचार करून तरी सरकारने चारा द्यावा अशी भावनिक साद मंगवडे येथील आजीबाईने शरद पवार यांच्यासमोर घातली.

खासदार शरद पवार यांनी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी सांगोला व मंगळवेढा तालुक्याचा दौरा आयोजित केला होता यावेळी शरद पवार यांनी मंगेवाडी गावातील चारा छावणी मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी चारा छावणीत जनावरे घेऊन आलेल्या आजीबाईने दुष्काळाची परिस्थिती पवार यांच्यासमोर मांडली. यावेळी शरद पवार यांनी जनावरांना मिळणारा चारा पुरेसे पाणी आणि दुधाचा भाव दूध याबद्दल विचारणा केली यावेळी जनावरांना हा चारा म्हणून दिला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले जनावरासाठी कडब्याची सोय करणे गरजेचे असताना फक्त ऊसच चारा म्हणून दिला जातोय उसामुळे जनावरांना खाताना जीभ कापण्याचा तसेच तोंडाला कापण्याचे प्रकार जास्त असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
दुभत्या जनावरांना फक्त 15 किलो चारा देण्यात येत असल्यामुळे पाच लिटर दूध देणारी जनावरे ही ही आता दोन लिटर वर आली आहेत. एवढ्या मोठ्या जनावराला सरकार फक्त पंधरा किलो चारा आणि 400 ग्राम पेंड देत आहे. दुभत्या जनावराला हा चारा खूपच कमी असून सरकारने दुभत्या जनावरांचा विचार करून चारा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

650 शेततळी असलेल्या अजनाळे गावात दुष्काळाच्या झळा-
सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव 1972 च्या दुष्काळात या गावातील प्रत्येकजण रोजगार हमीच्या कामावर रोजंदारी ला होते दुष्काळाची दाहकता लक्षात आल्यानंतर या गावातील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत त्यावेळी शरद पवार यांची भेट घेतली आणि पवारांनी या गावाला फळबागांसाठी प्रोत्साहन दिले गावातील तरुण शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड करून कोट्यावधी रुपये कमवले जे शेतकरी 1972 ला रोजगार हमी च्या कामावर गेली होती त्यात शेतकऱ्यांची आता टोलेजंग बंगला उभारले आहेत या गावातील गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटल्यामुळेच अजनाळे गावात तब्बल सहाशे पन्नास शेततळी आहेत मात्र आताच्या या भयावह दुष्काळामध्ये एकाही शेततळ्यात थेंबही पाणी शिल्लक राहिलेले नाही ही त्या मुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील दुष्काळाची भयानक दिसून येते दुष्काळी परिस्थिती पाहून राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारला दुष्काळाची जाणीव करून देण्यात येईल अशी माहिती ती शरद पवार यांनी यावेळी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.