पंढरपूर - मराठी भाषा ( Marathi Language Day ) ही ज्ञानसंपन्न म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा दर्जा आणि कसदार साहित्यात फार पूर्वीपासून निर्माण झालेला आहे. मराठीच्या अनेक बोली भाषा प्रांत भागातील रचनेनुसार पाहायला मिळते. मात्र, सध्याच्या काळातील घसरलेला मराठी भाषेचा दर्जा चिंता व्यक्त करणारा आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून मराठी भाषेला आलेली मरगळ दूर करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामीण मराठी साहित्य लेखक चंद्रशेखर गायकवाड ( Chandrashekhar Gaikwad Spoke On Marathi Language ) यांनी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत' शी बोलताना आपली खंत व्यक्त केली.
'मराठी साहित्याची झालेली मरगळ पाहावत नाही' -
अकलूज अशा ग्रामीण भागातील मराठी साहित्यासाठी काम करणारे चंद्रशेखर गायकवाड यांनी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मराठी साहित्यविषयक विविध अंगाने आपले मत मांडले आहे. यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर गायकवाड हे गेल्या 25 वर्षापासून मराठी साहित्य लेखनामध्ये योगदान दिले आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीतमध्ये सुमारे 22 ललित दर्जाच्या अभिजात साहित्य पुस्तकांची लेखणी त्यांनी ग्रामीण भागातील मराठी प्रेमींना दिले आहे. यासाठी त्यांना राज्य सरकार पासून ते विविध संघटनेच्या 50 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या विशिष्ट लेखनातून त्यांनी कथा कादंबरी ललित अशा अभिजात ग्रामीण भागातील साहित्यावर भर दिला आहे. विद्यार्थी दशकातच त्यांनी मराठी भाषेची समृद्धी त्यांना कळाली व त्यांच्या वयाच्या 19 व्या वर्षी पहिले पुस्तक वाचकांच्या हाती दिले होते. मात्र, सध्याच्या युगातील मराठी साहित्याची झालेली मरगळ पाहावत नसल्याची खंतही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
मराठी साहित्याचा डळमळला दर्जा -
मराठी साहित्यसंपदा ही ज्ञानसंपदा म्हणून जगभर मिरवली जाते. मात्र, 90च्या दशकातील मराठी साहित्य वाचक वर्ग मोठा होता. त्यानंतरच्या काळातील मराठी साहित्याला घरघर लागण्यास सुरुवात झाली. सध्याच्या काळात मराठी सारख्या लोकप्रिय साहित्याची पायीच गायब होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्या भाषेतील शब्दांचे मराठी भाषेवर झालेले अतिक्रमण अधिक कारणीभूत आहे. याचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास तेलुगू व तमिळ सिनेमा हा लोकांच्या परिसंवादाला हात घालताना दिसतो आहे. मात्र, त्याच मराठी सिनेमाला प्रेक्षक वर्गाचा अभाव दिसून येतो. आजच्या नव्या पिढीला लोकप्रिय व वाचक प्रिय साहित्य मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध राज्यातील भागांमध्ये संवाद मेळावे लेखन मेळावे व परिसंवाद अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, असा सल्लाही ज्येष्ठ लेखक गायकवाड यांनी दिला आहे.
राज्यातील ग्रंथालयांची झालेली दुरावस्था -
राज्य सरकारकडून ग्रंथालय वाचवण्यासाठी सर्व परीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, संगणक व भ्रमणध्वनीच्या युगामध्ये वाचक वर्ग चिटकलेला दिसून येतो. यातून फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे माहिती संकलीत केली जाते. मात्र, परिपूर्ण अशा ज्ञानाची कमतरता मात्र प्रत्येक नवीन येणाऱ्या पिढीमध्ये दिसून येईल. 90च्या काळामध्ये ग्रंथालयांमध्ये वाचकांची वर्दळ पाहायला मिळत होती. मात्र, सध्याच्या पिढीमध्ये एका शहराची संख्या लाखांच्या घरात आहे, तरीही त्या शहरातील ग्रंथालयांमध्ये दररोज दहा पेक्षाही कमी लोकांचा वावर दिसून येतो. यातूनच लोकांच्या बाबतीत असणारा उदासीनपणा दिसून येतो. पुस्तकातच माहितीपूर्ण व ज्ञानसंपन्न पिढी तयार करण्याची कुवत असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा - Fir Against Narayan rane : दिशा सालियनची बदनामी भोवली, राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल