ETV Bharat / state

Solapur Crime News : सोलापुरातील फपाळवाडीमध्ये चक्क अफूची शेती; 14 लाख किमतीचा अफू जप्त - Poppy cultivation in Barshi taluka in Solapur

सोलापुरातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील फपाळवाडी येथे तीन शेतकऱ्यांनी शेतामध्ये बेकायदेशीररित्या अफूची लागवड केली होती. अफू विकण्याच्या उद्देशाने केल्या या लावगडीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी सुमारे पंधरा लाखाचा ऐवज जप्त करत तालुका पोलीस स्टेशनमध्ये तीन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Solapur Crime News
सोलापुरातील फपाळवाडीमध्ये चक्क अफूची शेती
author img

By

Published : Mar 12, 2022, 3:23 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे तीन शेतकऱ्यांनी शेतामध्ये बेकायदेशीररित्या अफूची लागवड ( Poppy cultivation in Barshi taluka in Solapur) केली होती. अफू विकण्याच्या उद्देशाने केल्या या लावगडीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी सुमारे पंधरा लाखाचा ऐवज जप्त करत तालुका पोलीस स्टेशनमध्ये तीन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांची प्रतिक्रिया

साडे 14 लाखांचा अफू गेला जप्त -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना समजली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अरुण फपाळ यांच्या गट नंबर 27, 28, 29 रामेश्वर फपाळ यांच्या गट नंबर 31, 32 तर राज्य भोपाळ यांच्या गट नंबर 46 मध्ये पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांनी सुमारे 727 किलो अफू जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 14 लाख 54 हजार एवढी आहे.

गुन्हा दाखल -

अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी रामेश्वर गबरक फळ (वय 42) अशोक धर्मा फपाळ (वय 54) दत्तात्रेय उर्फ राजभाऊ फपाळ (वय 58) तिघेही रा. फपाळवाडी यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या पथकाने केली आहे. या घटनेचा अधिक तपास शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

हेही वाचा - Washim Girl Child Buried : एक वर्षाच्या चिमुकलीला बापानेच जिवंत पुरले, वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.