ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

विविध मागण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. मागण्या मान्य झाल्या नाही तर १५ जुलैपासून बेमुदत संप करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

author img

By

Published : Jun 30, 2019, 10:35 AM IST

आंदोलनात सहभागी कर्मचारी

सोलापूर - राज्यातील चौदा अकृषी विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे उच्च शिक्षण संचालनालय आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय दुर्लक्ष करत आहे. या विरोधात महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये १० जून, २०१९ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेले आहे.

आंदोलनात सहभागी कर्मचारी आणि माहिती देताना

सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतन त्रुटीरहित सातवा वेतन आयोग लागू करावा. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राबवावी. शिक्षकेतर पदे भरतीसाठी मान्यता द्यावी. ३० टक्के पदे कपातीचा निर्णय रद्द करावा. समान सेवा प्रवेश नियम लागू करावा. यांसह अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांच्याबाबत उच्च शिक्षण संचालनालय आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय दुर्लक्ष करीत आहे. त्याविरोधात महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये १० जून, २०१९ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेले आहे.

त्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून शनिवारी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीसुध्दा एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. त्यानुसार सर्व कर्मचारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतींसमोर दिवसभर निदर्शने करण्यात आली. या संपात विद्यापीठ कर्मचारी संघटना, ऑफीसर्स फोरम, कास्ट्राईब संघटना, चतुर्थश्रेणी संघटनांचा महासंघाने पुकारलेल्या संपात सक्रीय सहभाग आहे. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास १५ जुलै, २०१९ पासून विद्यापीठ बेमुदत संप करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन काशिद, ऑफीसर्स फोरम, कास्ट्राईब संघटना चतुर्थश्रेणी संघटना यांनी दिला आहे.

याप्रसंगी शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सांवत यांनी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला. विधिमंडळात हा प्रश्न मांडला असून उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या सातवा वेतनासह प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार, असे आमदार सावंत यांनी सांगितले. मात्र, दिवसभर सातव्या वेतन व प्रलंबित मागण्यांच्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. या एक दिवसीय लाक्षणिक संपात विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सामिल झाले होते. त्यामुळे विद्यापीठ कार्यालयात एकही कायम कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. तर या विद्यापीठाच्या आंदोलनास कुलगुरु डॉ. मृणालिणी फडणवीस, कुलसचिव डॉ. विकास घुटे , वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रेणिक शहा यांनी भेट देवून कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

Intro:सोलापूर : राज्यातील चौदा अकृषी विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने 'वेतन त्रुटीरहित सातवा वेतन आयोग, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना,शिक्षकेत्तर पदे भरतीसाठी मान्यता, तीस टक्के पदे कपातीचा निर्णय रद्द, समान सेवा प्रवेश नियम यासह अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांच्याबाबत उच्च शिक्षण संचालनालय आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्रालया दुर्लक्ष करीत आहे.त्याविरोधात महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये दि.10 जून, 2019 पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेले आहे. Body:
त्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचारी सुध्दा एक दिवसाचा लाक्षणिक संप केेला. त्यानुसार सर्व कर्मचारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर दिवसभर निदर्शने करण्यात आली. या संपात विद्यापीठ कर्मचारी संघटना, ऑफीसर्स फोरम, कास्ट्राईब संघटना , चतुर्थश्रेणी संघटनांचा महासंघाने पुकारलेल्या संपात सक्रीय सहभाग आहे.व त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास दि.15 जुलै 2019 पासून विद्यापीठ बेमुदत संप करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन काशिद,ऑफीसर्स फोरम,कास्ट्राईब संघटना चतुर्थश्रेणी संघटना यांनी दिला आहे.याप्रसंगी शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. दत्तात्रय सांवत यांनी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला. Conclusion:विधीमंडळात हा प्रश्न मांडला असून उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या सातवा वेतनासह प्रलंबित प्रश्न धसास लावणार असे आमदार सावंत यांनी सांगितले.मात्र दिवसभर सातव्या वेतन व प्रलंबित मागण्यांच्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून सोडला.या एक दिवसीय लाक्षणिक संपात विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येंने सामिल झाले होते.त्यामुळे विद्यापीठ कार्यालयात एकही कायम कर्मचारी कामावर नसल्याने विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसुन आले.तर या विद्यापीठाच्या आंदोलनास मा. कुलगुरु डाॅ. मृणालिणी फडणवीस, कुलसचिव डाॅ. विकास घुटे , वित्त व लेखाधिकारी डाँ. श्रेणिक शहा यांनी भेट देवून कर्मचार्‍यांच्या मागण्या बाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.