ETV Bharat / state

अनैतिक संबंधातून मित्राचा खून; पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या - सोलापूर खून बातमी

सलीमने विश्वास केला आणि नबीलाल याच्या दुचाकीवर बसून गेला. शेळगी पासून काही अंतरावर घोडेपीर दर्गा आहे. तेथील झाडाखाली बसून दोघे दारू पीत बसले आणि चर्चा करू लागले. नबीलालने सलीम समोर त्याच्या पत्नीचा विषय काढला. यावरून वाद सुरू झाला. याच वादात नबीलालने धारदार शस्त्राने सलीमच्या डोक्यात वार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

अटक आरोपी
अटक आरोपी
author img

By

Published : Mar 13, 2021, 1:21 PM IST

सोलापूर-मित्राच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यामधून दोघांच्या मैत्रीत कटुता निर्माण झाली. शेवटी त्याने दारू पाजवून मित्राचा काटा काढला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीला बेड्या ठोकून सत्य माहीती समोर आणली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे.सलीम राज अहमद शेख(वय ३४ )असे मृत तरूणाचे नाव आहे. तर नबीलाल शेख असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

सलीम व नबीलाल दोघे मित्र आणि मार्केट यार्डात हमालीचे काम करत
सलीम शेख व नबीलाल शेख हे दोघे अनेक दिवसांपासून मित्र होते.मार्केट यार्डात दोघे हमालीचे काम करत होते.सलीम याची पत्नी देखील यार्डात हमाली करत होती.नबीलाल याची वाईट नजर सलीम याच्या पत्नीवर पडली.नबीलाल याने सलीमच्या पत्नीस आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.आणि सलीम याची पत्नी व नबीलाल हे दोघे प्रेमात होते.सलीमला याची कुणकुण लागताच त्याने नबीलालला खडसावून सांगितले हे चुकीचे आहे.पण नबीलाल ऐकण्याच्या भूमिकेत नव्हता.तो दिवसा ढवळ्या सलीम यांच्या घरी येऊन सलीमच्या पत्नीला भेटत होता.सलीमच्या आईने देखील या अनैतिक संबंधाला कडाडून विरोध केला होता.

सासूने देखील सुनेची समजूत काढली होती
आपली सूनेने परपुरुषासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले आहे,याची माहिती मिळताच सासूने ,याचा कडाडून विरोध केला होता.आपल्या मुलाचे संसार तुटेल या भीतीने सासूने सुनेची समजूत काढली होती. पण सलीमची पत्नी नबीलालच्या प्रेमात होती. शेवटी सासूने नबीलालचे घरी येणे जाणे बंद केले होते. यावर नबीलाल खूप चिडला होता. तसेच सलीम देखील नबीलालला भेटण्यासाठी टाळाटाळ करत आणि शिवीगाळ करत होता. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून नबीलालने सलीमच्या खुनाचा नियोजन केला.

दारू पाजून नशेत डोक्यात वार केला
मंगळवारी ९ मार्च सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नबीलाल हा सलीम यांच्या घरी आला.अतिशय प्रेमाने बोलू लागला. तसेच सलीमची समजूत काढू लागला. सलीमने विश्वास केला आणि नबीलाल याच्या दुचाकीवर बसून गेला.शेळगी पासून काही अंतरावर घोडेपीर दर्गा आहे. तेथील झाडाखाली बसून दोघे दारू पीत बसले आणि चर्चा करू लागले. नबीलालने सलीम समोर त्याच्या पत्नीचा विषय काढला. यावरून वाद सुरू झाला.याच वादात नबीलालने धारदार शस्त्र बाहेर काढत आणि सलीमच्या डोक्यात वार केला.यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला.

काही तासांतच पोलिसांनी नबीलालच्या आवळल्या मुसक्या
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व जबाब नोंदवून नबीलालचा शोध सुरू केला.काही तासातच पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा-माजी आमदार प्रभाकर घार्गेसह झेडपी सदस्य मनोज घोरपडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.