ETV Bharat / state

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आमदार शहाजी बापूंचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

author img

By

Published : Dec 4, 2022, 6:20 PM IST

मला पक्षाने आदेश दिला तर, मी थेट बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार घालून येईन. फक्त पक्षाने तसा आदेश द्यायल हवा. असे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil on Border Dispute ) यांनी केले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर ( Maharastra Karnataka Border Dispute ) त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

सोलापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ( Maharastra Karnataka Border Dispute ) सुरू असताना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठं वक्तव्य ( Shahaji Bapu Patil on Border Dispute ) केले आहे. आज 3 डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त सांगोला येथे दिव्यांग बांधवांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आमदार शहाजी बापू माध्यमांशी संवाद साधताना

काय म्हणाले शहाजी बापू : कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मला पक्षाने आदेश दिला तर, मी थेट बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार घालून येईन. फक्त पक्षाने तसा आदेश द्यायला हवा, असे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.

मंत्र्यांना कर्नाटक सरकारचा नकार : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्नी वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रीत काही गावांवर दावा ठोकला आहे. तर महाराष्ट्रातील अनेक गावांनीही कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. तर कर्नाटकातील मराठी भाषिक गावांतही संवेदनशील वातावरण आहे. समन्वय समितीमार्फत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत कर्नाटक सरकारने त्यांना स्पष्ट नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.