ETV Bharat / state

Fadnavis On Ganpatrao Deshmukh: विधिमंडळाच्या परिसरात गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - memorial to Ganpatrao Deshmukh

गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधी मंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवारी) मार्गदर्शन करत होते.

Fadnavis On Ganpatrao Deshmukh
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 13, 2023, 10:48 PM IST

सोलापूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणपतराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न अत्यंत धडाडीने मांडले. सामान्यांच्या उत्थानासाठी सातत्याने ते जीवनभर झटत होते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे; मात्र राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव देशमुख होते. त्यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम केले, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील, सर्वश्री आमदार जयंत पाटील, बबनराव शिंदे, संजय शिंदे,सचिन कल्याणशेट्टी,शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, राजेंद्र राऊत,यशवंत माने,राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

गणपतराव देशमुख 11 वेळा विधानसभेवर: कापूस मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या भागात सूतगिरणी चालवणे कठीण आहे. तरी गणपतराव देशमुख यांनी सांगोला सारख्या दुष्काळी भागात सूतगिरणीची स्थापना करून या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. अनेक संकटाचा सामना करून ही सूतगिरणी यशस्वीपणे चालवली. गणपतराव देशमुख यांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या मार्फत शासनाकडून न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी केले. शेतकरी कामगार व वंचित घटकाबद्दल सातत्याने त्यांचे प्रश्न मांडून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारे गणपतराव देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे दुष्काळी भाग असला तरी मानाने कसे जगायचे ही कार्यपद्धती त्यांनी या भागातील लोकांच्या अंगी रुजवल्याचे मत व्यक्त केले.

डाळिंब पिकावरील रोगाकडे वेधले लक्ष: कोरोनामुळे जागतिक स्तरावरील अनेक उद्योग बंद झाले. सांगोला येथील सूतगिरणीलाही कोरोनाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे सूतगिरणीची आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे. तरी शासनाने सूतगिरणीला मदत करावी. तसेच या भागातील डाळिंब पीक हे अत्यंत महत्त्वाचे असून या पिकावर सध्या रोगाचे प्रमाण वाढत आहेत, तर डाळिंब संशोधन केंद्राच्या माध्यमातून यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणातील डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचा नामांतरण सोहळाही संपन्न झाला. त्यानंतर व्यासपीठावर रतनबाई गणपतराव देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, महादेव जानकर, दीपक साळुंखे पाटील, सूतगिरणीचे संचालक चंद्रकांत देशमुख, शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting : काका-पुतण्यांची गुप्त बैठक; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...
  2. Sharad Pawar With BJP : मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतो...; भाजपासोबत जाण्याच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण
  3. Aaditya Thackeray : तिघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा महायुतीला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.