ETV Bharat / state

वकील ते विधानसभेचे 'विद्यापीठ' गणपत आबा देशमुख यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी - वकील ते विधानसभा

शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून 1962 साली सांगोला मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ती मोठ्या मताधिक्याने जिंकली सुद्धा होती. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या काळातील प्रवास विधानसभेत बसून आमदार गणपतराव देशमुख यांनी पाहिला आहे.

गणपत आबा देशमुख यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी

author img

By

Published : Jul 31, 2021, 9:54 AM IST

Updated : Jul 31, 2021, 10:00 AM IST

पंढरपूर(सोलापूर)- आयुष्यातील 55 वर्षे विधिमंडळाचे सदस्य म्हणून कायम जनसेवा करणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी उशिरा रात्री निधन झाले. राज्यातील शेतकरी व कामगारांच्या प्रश्नासाठी झगडणारा, तत्वनिष्ठ राजकारणी, सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे, सहकार चळवळीतील नेते तसेच राज्यातील प्रश्नांचा अभ्यासपूर्वक विधानसभेत आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला होती. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून विविध नेत्यांनी गणपतराव देशमुखांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गणपत आबा देशमुख यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची मोठी हानी झाली आहे. माजी आमदार गणपत आबा देशमुख यांचा वकील ते विधानसभेतील विद्यापीठ असा जीवनकाल राजकीय नेत्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

गणपत आबा देशमुख यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी
गणपत आबा देशमुख यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी

1962 पासून लाल बावट्याचा एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता...

पुणे येथे वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी शेतकरी व कामगार यांच्या चळवळीत स्वतःला वाहून घेतले. पुढे त्यांनी वकील पेशा सोडून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लाल बावटा हाती घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून 1962 साली सांगोला मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ती मोठ्या मताधिक्याने जिंकली सुद्धा होती. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या काळातील प्रवास विधानसभेत बसून आमदार गणपतराव देशमुख यांनी पाहिला आहे. 1962 पासून लाल बावट्याचा एकनिष्ठ असणाऱ्या गणपत आबा देशमुख यांना दोनदा मंत्रिपदाची संधी मिळाली होती. ते कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी क्षेत्रातल्या विविध विधयेकांना मंजुरी व न्याय देण्याचे काम केले आहे.

दुष्काळी सांगोला तालुका ते डाळिंब बागायतदार सांगोला...सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला व अक्कलकोट तालुका तालुके कमी पावसाचे तालुके म्हणून जात होते. त्यामुळे या ठिकाणी शेती पाण्‍याचा प्रश्‍न विषय प्रमाणात गंभीर बनला होता. आबासाहेबांनी दुष्काळी सांगोला तालुक्याची ओळख पुसण्यासाठी टेंभू, म्हैसाळ योजना, तसेच शिरभावी गावची 81 पाणीपुरवठा योजना, नीरा उजवा कालव्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावांनाही पाणी पुरवठा करण्यासाठी ते सतत बैठका मेळावे व आंदोलन राज्य सरकारला याबाबत विचार करण्यासाठी भाग पाडले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शुभहस्ते टेंभू योजनेचे भूमिपूजनही झाले. यावेळी गणपतराव देशमुख व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. पाणी परिषदा घेऊन तालुक्यातील विरोधी सरकारलाही दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी भाग पाडणारे आबासाहेब हे एकमेव राजकारणी होते. त्यामुळेच आज सांगोला तालुक्यातील डाळिंब बागायतदार राज्य तसेच देशाची ओळख निर्माण झाली आहे.

गेल्या दीड वर्षापासून सोलापूरच्या राजकारणामधील न भरून निघणारी हानी-

कोरोना पहिला लाटेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजू बाबू पाटील, वा.ना.महाराज उत्पात यांचे निधन झाले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण मोठी हानी झाली आहे. त्यातच आता 55 वर्ष आमदार आणि राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार गणपत आबा देशमुख यांचेही वृद्धपणामुळे निधन झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या सुरुवातीच्या राजकारणाच्या काळात जिल्ह्यावर दिवंगत नेते शंकरराव मोहिते पाटील व नामदेव जगताप यांचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा होता. गणपतराव देशमुख यांनी आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली होती. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सांगोला तालुक्यातील बाबांनी कामगार संघटनेचे प्रतिनिधी बसवले. तळागळतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन बाबांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

Last Updated : Jul 31, 2021, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.