ETV Bharat / state

माघवारी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन, ३१ जानेवारीला रिंगण सोहळ्याचे आयोजन - पालखी सोहळा

माघ महिन्यात सोलापूरहुन पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यातील रिंगणात धावणाऱ्या अश्वाचे आज(सोमवारी) सोलापूरात पूजन करण्यात आले. या सोहळ्यातील आकर्षण असणारा गोल रिंगण सोहळा यंदा ३१ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता नॉर्थकोट प्रशाला येथे पार पडणार आहे.

माघवारी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन
माघवारी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन
author img

By

Published : Jan 20, 2020, 9:19 PM IST

सोलापूर - माघ महिन्यात सोलापूरहुन पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यातील रिंगणात धावणाऱ्या अश्वाचे आज(सोमवारी) सोलापुरात पूजन करण्यात आले. माघवारी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष तथा ह.भ.प. महेश महाराज जाधव यांच्या हस्ते या अश्वाचे पूजन करण्यात आले, तसेच अश्वाचा सरावही करुन घेण्यात आला.

माघवारी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन

या वारकऱ्यांच्या दिंडीला २०० वर्षांची परंपरा आहे. माघवारी पालखी सोहळ्यातील सर्वांचे आकर्षण असणारा गोल रिंगण सोहळा यंदा ३१ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता नॉर्थकोट प्रशाला येथे पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्या माध्यमातून होम मैदान या ठिकाणी माघवारी पालखी सोहळ्यातील रिंगणाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प.ज्योतीराम चांगभले, ह.भ.प.बळीराम जांभळे, ह.भ.प.संजय पवार, ह.भ.प. अरुण महाराज आवताडे, मोहन शेळके, महेश चोरमुले, विष्णूपंत मोरे, सोमनाथ ताकमोगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - विषमता आणि बेरोजगार यापासून मुक्ती म्हणजे देशभक्ती - प्रा. अजित अभ्यंकर

हा सोहळा भव्यदिव्य होणार असून नॉर्थकोट मैदान सोलापूर येथे वारकरी तसेच नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी शाळेतील विद्यार्थी, युवक संघटना, सामाजिक संघटना, महिला भजन मंडळ, शहरातील ४३ दिंड्या, परिसरातील ५५ दिंड्या सहभागी होणार आहेत. हा भाग्याचा क्षण सोलापूरातील भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी अंदाजे १ लाख भाविक उपस्थित राहतील असे कार्यक्रमाचे संयोजक आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - 24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Intro:सोलापूर : माघ महिन्यांत सोलापुरातून पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यातील रिंगणांत
धावणाऱ्या अश्वाचे आज सोलापूरात पूजन करण्यात आलं.माघवारी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष तथा ह.भ.प. महेश महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात अश्वाचे पूजन करण्यात आले तसेच अश्वाचा सरावही करुन घेण्यात आला.

Body:या वारकऱ्यांच्या दिंडीची दोनशे वर्षांची परंपरा आहे.माघवारी पालखी सोहळ्यातील सर्वांचे आकर्षण असणारा गोल रिंगण सोहळा यंदा शुक्रवार ३१ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता नॉर्थकोट प्रशाला येथे पार पडणार आहे.त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्या माध्यमातून होम मैदान या ठिकाणी माघवारी पालखी सोहळ्यातील रिंगणाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले.यावेळी वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प.ज्योतिराम चांगभले, ह.भ.प.बळीराम जांभळे,ह.भ.प.संजय पवार,ह.भ.प. अरुण महाराज आवताडे, मोहन शेळके,महेश चोरमुले,विष्णूपंत मोरे,सोमनाथ ताकमोगे आदी उपस्थित होते.

Conclusion:हा सोहळा भव्य आणि दिव्य होणार असून नॉर्थकोट मैदान सोलापूर येथे वारकरी तसेच नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.या सोहोळ्यासाठी शाळेतील विद्यार्थी,युवक संघटना,सामाजिक संघटना,महिला भजनी मंडळ,शहरातील ४३ दिंड्या, तर परिसरातील ५५ दिंड्या सहभागी होणार आहेत. हा भाग्याचा क्षण सोलापूरातील भाविककांसाठी श्रध्देचा विषय असल्याने अंदाजे १ लाख भाविक उपस्थित राहतील असे कार्यक्रमाचे संयोजक आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.