पंढरपूर - मोडनिंब येथे 'तू आमचे वाराह का मारले' तसेच पूर्ववैमनस्यातूनचा राग मनात धरून युवकाचा खून केल्याप्रकरणी दोघा जणांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.बी. भस्मे यांनी ही शिक्षा ठोठावली.
दोघा जणांना जन्मठेपेची शिक्षा -
बार्शी जिल्हा सत्र न्यायालयाने गणेश सोनबा धोत्रे (वय 25), दीपक सुनील धोत्रे (वय 26, दोघे रा. मोडनिंब) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. विकास धोत्रे या युवकाचा खून झाला होता. विनोद धोत्रे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर 2017 रोजी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा केला होता. याप्रकरणी ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. अमृत खेडेकर यांनी सहाय्य केले.
वराहाच्या कारणावरून खून -
15 सप्टेंबर 2017ला मोडनिंब येथील श्रीपाद माऊली मठात विकास धोत्रे हा बसला होता. यावेळी आरोपी गणेश व दीपक यांनी मठात गेले. त्यांच्यात वराहाचे पिल्लू का मारले? यावरून वाद सुरू झाला. विकास यांच्यावर गणेश धोत्रे याने डोक्यात दगड घातला तर दिपक धोत्रे याने चाकूने गळावर वार केले. अति रक्तस्त्रावाने विकास हा जागेवरच त्याचा झाला. या प्रकरणी त्याचा भाऊ विनोद धोत्रे याने दिलेल्या फिर्यादीवरुन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोघा आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले.
हेही वाचा - भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांची आत्महत्या - राऊत
न्यायाधीश भस्मे यांनी ठोठावली शिक्षा -
जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित भस्मे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी शवविच्छेदन अहवालात नमूद जखमा आणि साक्षीदारांनी सांगितलेल्या जखमांमध्ये सुसंगती आढळली. आरोपींनी घटनेवेळी घातलेल्या कपड्यावरील रक्ताचे डाग अहवालात जुळले. विकास याच्या अंगावरील जखमा या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्राने झाल्याचा दुजोरा वैद्यकीय अधिकार्यांनी दिला. आरोपींनी केलेला गुन्हा सिद्ध झाला आहे, असा युक्तिवाद अॅड. दिनेश देशमुख यांनी केला.