ETV Bharat / state

सृष्टीची पॉझिटिव्ह 'दृष्टी', कोरोना महामारीत दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान

शहरातील भोसले चौक येथील रहिवाशी असलेली सृष्टी सुधीर तम्मेवार या तरुणीने दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान केले. आपल्यातील धाडसी बाणा दाखवून तिने कोरोनाच्या लढाईत दोन जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.

Srushti tammevar
सृष्टी तम्मेवार
author img

By

Published : Apr 23, 2021, 1:45 PM IST

बार्शी (सोलापूर) - सद्यस्थितीत रुग्णालयात बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमरता जाणवत आहे. तर, दुसरीकडे रक्त बाटल्या अन् प्लाझ्माचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, डोनरने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक डॉक्टर्सं सातत्याने करत आहे. बार्शीतील सृष्टी तम्मेवार हिने कोरोना या कठिणप्रसंगी पॉझिटीव्ह दृष्टी जगाला दाखवून दिली आहे.

शहरातील भोसले चौक येथील रहिवाशी असलेली सृष्टी सुधीर तम्मेवार या तरुणीने दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान केले. आपल्यातील धाडसी बाणा दाखवून तिने कोरोनाच्या लढाईत दोन जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. सृष्टीला सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने उपचार घेत कोरोनावर मात केली.

कोरोनावर मात केल्यानंतर, आता आपण एखादा जीव वाचविण्याच्या कामी येऊ शकतो, हे समजताच तिने ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले. सृष्टीने शहरातील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीत जाऊन अँटीबॉडीज चेक केल्यानंतर पहिला प्लाझा डोनेट केला. विशेष म्हणजे एका प्लाझ्मा डोनेटवर न थांबवता, तिने एका रुग्णाला तातडीचा प्लाझ्मा आवश्यक असल्याचे समजताच गुरुवारी दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केला आहे.

सृष्टीने आपल्या कृतीतून अनेकांना जगण्याची दृष्टीच दाखवून दिली. विशेष म्हणजे सृष्टीचे वडी सुधीर तम्मेवार हेही शतकवीर डोनर आहेत. सुधीर तम्मेवार यांनी 100 वेळा रक्तदान केले असून 50 पेक्षा अधिकवेळा प्लेट्सलेट डोनेट केल्या आहेेत. त्यामुळे, वडिलांपासूनच दानशूरतेची भावना तम्मेवार कुटुंबीयांमध्ये रुजल्याची भावना सृष्टीने व्यक्त केली.

तसेच, कोरोना महामारीच्या काळात आपण एखादा जीव वाचविण्याच्या कामी येतो, यापेक्षा मोठे पुण्य काय? असा विचारही तिने मांडला. मी प्लाझ्मा डोनेट केल्याचा मलाच सर्वाधिक आनंद असल्याचे सृष्टीने म्हटले. तर, कोरोनावर मात केलेल्यांनी निडर होऊन प्लाझ्मा दान करावे, असे आवाहनही सृष्टीने केले आहे. सृष्टीच्या या धाडसी बाण्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ, पत्रकार संतोष सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.