ETV Bharat / state

पोलीस उपअधीक्षकाने मागितली पाच लाखांची लाच; कर्नाटकातील पोलीस अधिकाऱ्यावर सोलापुरात गुन्हा दाखल - solapur police

हत्येप्रकरणामध्ये पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपअधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा कर्नाटकातील विजयपूर येथील पोलीस उपअधीक्षकांविरोधात सोलापूरात दाखल करण्यात आला आहे.

अटकेतील पोलीस उपअधीक्षक
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:19 PM IST

सोलापूर - पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कर्नाटकातील विजयपूर येथील पोलीस उपअधीक्षकांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर हत्येप्रकरणी पोलीस उपअधीक्षकांनी ५ लाखाची लाच मागितली होती. या प्रकरणात प्रत्यक्ष लाच घेणाऱ्या खासगी व्यक्ती आणि कर्नाटकातील पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

विजयपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांचा मे २०१९ मध्ये खून झाला. या प्रकरणात सोलापुरातील एमआयएमचे नेते तौफिक शेख यांना अटक करण्यात आली. तौफिक शेख यांच्यासह इतर एका व्यक्तीविरूद्ध आरोपी म्हणून संशय होता. याच व्यक्तीकडून या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी तपास अधिकारी असलेले पोलीस उपअधीक्षक महेश्वर गौड पाटील यांनी ५ लाखांची लाच मागितली होती. ही लाच घेण्यासाठी महेश्वर गौड यांच्या वतीने कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील मनगोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मल्लिकार्जुन पुजारी आणि रियाज कोकटनूर शहरात आले. शहरातील शासकीय विश्रामगृहात लाच घेण्यासाठी ते दोघेही थांबले.

शासकीय विश्रामगृहात लाचलुचपत विरोधी पथकाने सापळा लावला. यामध्ये पोलीस हवालदार मल्लिकार्जुन पुजारी आणि रियाज कोकटनूर यांना १ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणात पोलीस उपअधीक्षकांसह तिघांवर सोलापुरातील सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:mh_sol_02_karnatka_dysp_in_trap_7201168
५ लाखाच्या लाचेसाठी कर्नाटकातील डीवायएसपीवर सोलापूर गून्हा
खूनाच्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच
सोलापूर-
५ लाख रूपयाची लाच मागितल्या प्रकरणी कर्नाटकातील विजयपूर येथील डीवायएसपी विरूद्ध सोलापूरात गून्हा दाखल करण्यात आला आहे. विजयपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर हत्येप्रकरणी आरोपी न करण्यासाठी डीवायएसपीने ५ लाखाची लाच मागितली होती. या प्रकरणात प्रत्यक्ष लाच घेणाऱ्या खाजगी व्यक्ती आणि कर्नाटकातील पोलिस कॉन्स्टेबला अटक करण्यात आली आहे.Body:विजयपूर येथील कॉंग्रेस कार्य़कर्त्या रेश्मा पडेकनूर यांचे मे २०१९ मध्ये खून झाला आहे. या प्रकरणात सोलापूरातील एमआयएमचे नेते तौफिक शेख यांना अटक केली आहे. तौफिक शेख यांच्यासह इतर एका व्यक्तीविरूदद्ध आरोपी म्हणून संशय होता. याच व्यक्तीकडून या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी तपास अधिकारी असलेले पोलिस उप अधिक्षक महेश्वर गौड पाटील यांनी ५ लाख रूपयाची लाच मागितली होती. ही लाच घेण्यासाठी महेश्वर गौड यांच्या वतीने कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील मनगोळ पोलिस स्टेशन येथे कार्य़रत असलेल्या मल्लिकार्जून पूजारी आणि खाजगी व्यक्ती रियाज कोकटनूर यांनी सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात लाच घेण्यासाठी आले होते.
सोलापूरातील शासकीय विश्रामगृहात लाचलूचपत विरोधी पथकाने सापळा लावला आणि यामध्ये पोलिस हवालदार मल्लिकार्जून पूजारी आणि रियाज कोकटनूर यांना १ लाख रूपये घेतांना रंगेहात पकडले.
या प्रकरणात पोलिस उप अधिक्षकासह तिघांवर सोलापुरातील सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.