ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या भीष्म पितामह गणपतराव देशमुख अनंतात विलीन, पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - माजी आमदार गणपतराव देशमुख

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. कार्यकर्त्यांनी साश्रूपूर्ण नयनांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

spla
Funeral of Ganapatrao Deshmukh
author img

By

Published : Jul 31, 2021, 7:58 PM IST

Updated : Jul 31, 2021, 8:21 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - सांगोल्याचे 55 वर्षे आमदार म्हणून मतदारसंघाचे काम पाहणारे व विधानसभेचे विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेले भाई गणपत देशमुख यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगोला शहरातील सांगोला सूतगिरणी मैदानामध्ये माजी मंत्री गणपत आबा देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. 'आबा साहेब अमर रहे अमर रहे', 'आबासाहेब तुम अमर रहे' अशा प्रकारच्या घोषणांनी लाडक्या नेत्याला नागरिकांनी निरोप दिला. त्यांचे सुपुत्र बाबासाहेब देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या पार्शिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे सोलापूर सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार या वेळेस उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाकडून गणपत आबा देशमुख यांना मानवंदना..

माजी मंत्री गणपत आबा देशमुख यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी यांना पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते तिरंगा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस दलाकडून माजी आमदार गणपत आबा देशमुख यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणपतराव देशमुख अनंतात विलीन
सांगोला शहरातून आमदार गणपत आबा यांच्या पार्थिवाची रॅली..

सांगोला मतदारसंघाचे अकरा वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या गणपत आबा देशमुख यांना सांगोल्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. सकाळी अकराच्या सुमारास अंतिम दर्शनासाठी सांगोला शहरातून आबांच्या पार्थिवाची रॅली काढण्यात आली. सांगोला कृषी बाजार समितीपासून सांगोला पंचायत समिती, कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जय भवानी चौक, सांगोला नगरपरिषद समोर चौक, नेहरू चौक, स्टेशन रोड यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांना शेतकरी सूतगिरणी मैदानावर आणण्यात आली. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास माजी मंत्री गणपत देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात श्रद्धांजली वाहून अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनेक नेत्यांची अंत्यविधीसाठी हजेरी -

माजी मंत्री गणपत आबा देशमुख यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी सूतगिरणी मैदान परिसरात हजेरी लावली होती. यामध्ये पालकमंत्री दत्तामामा भरणे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार स्मिता पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.

Last Updated : Jul 31, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.