ETV Bharat / state

छत्रपती शाहू फाउंडेशनतर्फे सांगोल्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Sangola essential things distribution

लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशनच्या वतीने यापूर्वीही खिलारवाडी, गायगव्हाण, महुद बु, आदी गावातील निराधार, विधवा, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

Essential things distribution in sangola
सांगोल्यात गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
author img

By

Published : Jun 2, 2020, 3:20 PM IST

सांगोला (सोलापूर) - सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका आहे. अजूनही गरीब व गरजू लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत. या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील शिरभावीत 40 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

येत्या काळातही आपण लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील उपेक्षितांच्या, शोषितांच्या घरांपर्यंत मदत पोहचविणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच व्यावसायिक, नोकरदार आणि तरुणवर्गाने एकत्रित येऊन याप्रकारे मदत करावी, असे आवाहनही कांबळे यांनी केले.

लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशनच्या वतीने यापूर्वीही खिलारवाडी, गायगव्हाण, महुद बु, आदी गावातील निराधार, विधवा, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी सरपंच पांडुरंग बंडगर, पोलीस पाटील सोमनाथ ढोले, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट रणदिवे, संतोष रणदिवे, संजय रणदिवे, भगवान रणदिवे, भीमराव रणदिवे, महेश रणदिवे, अक्षय रणदिवे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.