ETV Bharat / state

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील मुंबई येथे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी जनसेवा संघटनेची स्थापना केली होती. त्या संघटनेने मधूनच डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली होती.

Dhawalsinh
Dhawalsinh
author img

By

Published : Jan 27, 2021, 3:12 PM IST

पंढरपूर - अकलूज येथील मोहिते-पाटील घराण्यातील दिवंगत व माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे गुरुवारी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जनसेवा संघटनेच्या माध्यमातून काम

प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी जनसेवा संघटनेची स्थापना केली होती. त्या संघटनेने मधूनच डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली होती. मध्यंतरीच्या काळात डॉ. धवलसिंह यांनी शिवसेनेतही काम केले होते.

अकलूज येथे काका-पुतण्याची लढत

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अकलुज ग्रामपंचायतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील विरुद्ध धवलसिंह मोहिते-पाटील अशी काका-पुतण्याची लढत झाली होती. धवलसिंह यांनी काकाला कडवे आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत मोहिते पाटील करण्याचा धबधबा असतानाही उर्वशीराजे मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती, तर निवडणुकीमध्ये दोन जागेवर विजय मिळवला होता. या लढाईची चर्चा राज्यभर झाली होती.

आक्रमक नेतृत्व म्हणून जिल्ह्यात ओळख

सोलापूर जिल्ह्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखा मातब्बर नेता असतानाही काँग्रेस पक्षाला मरगळ आली आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्याला एक आक्रमक चेहरा मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

मुंबई येथे काँग्रेस कार्यालयमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कमिटी टिळक भवन येथे गुरुवारी दुपारी ३ वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे बडे नेतेही उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.