पंढरपूर (सोलापूर) - सांगोला विधानसभेचे विक्रमवीर आमदार गणपत देशमुख यांच्या कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीसाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) सांगोला दौर्यावर येणार आहेत. माजी आमदार गणपत देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सांगोला येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
सांगोला विधानसभेतून 55 वेळा आमदारकी भूषवणारे गणपत देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांचे पुत्र बाबासाहेब देशमुख यांच्या भेटीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. पुणे येथून सकाळी साडेनऊच्या सुमारास ते सांगोल्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी दीडच्या सुमारास सांगोला येथे त्यांचे आगमण होणार आहे.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी चारच्या सुमारास बार्शी येथे जाणार आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही सुपूत्र नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. नूतन वधू वरास शूभ आशीर्वाद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आमदार राऊत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यातील 687 गावे कोरोना मुक्त, काही तालुक्यात निर्बंध; तर काही तालुक्यात शिथिलता