ETV Bharat / state

माढ्यात घासून नाही, ठासून येणार; दिपक साळुंखे पाटलांचा दावा

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपने माढ्यात दबाव टाकून पक्षप्रवेश सुरू केला आहे, असा आरोप दीपक साळुंखे-पाटील यांनी केला आहे. मात्र, याचा कोणताही फायदा भाजपला मिळत नाही असे सध्याचे चित्र आहे. भाजपने कितीही जोर लावला तरी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता फक्त किती मताधिक्य मिळणार याची उत्सुकता असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील
author img

By

Published : Apr 14, 2019, 5:51 PM IST

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार हा घासून नाही तर ठासून येणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा केलेला आहे. भाजपला नकार घंटा देत राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी भाजपची संपूर्ण टीम म्हाडा लोकसभा मतदारसंघांमध्ये कामाला लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून पूर्वाश्रमीच्या संजय शिंदे यांना उमेदवारी देऊ केली होती.

संजय शिंदे यांनी अडीच वर्षे भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूनदेखील माढ्यातून भाजपची उमेदवारी नाकारली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा संजय शिंदे यांच्यावर राग आहे. संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघातील अनेकांना भाजप पक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर दररोज २ ते ३ जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपने माढ्यात दबाव टाकून पक्षप्रवेश सुरू केला आहे, असा आरोप दीपक साळुंखे-पाटील यांनी केला आहे. मात्र, याचा कोणताही फायदा भाजपला मिळत नाही, असे सध्याचे चित्र आहे. भाजपने कितीही जोर लावला तरी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता फक्त किती मताधिक्य मिळणार याची उत्सुकता असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माढ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सध्या जोरदार प्रचार सुरू असून प्रचारांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला माणसेदेखील मिळत नाहीत, अशी विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार हा विक्रमी मताधिक्‍याने विजयी होणार असल्याचे दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातदेखील सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसची मुख्य लढत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांशी असून भाजपशी नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:R_MH_SOL_01_14_DIPAK_SALUNKHE_S_PAWAR
माढ्यात घासून नाही तर ठासून येणार, आता प्रतीक्षा फक्त मताधिक्याची, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांचा दावा
सोलापूर-
महारा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार हा घासून नाही तर ठासून येणार आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी दिली आहे

Body:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा केलेला आहे भाजपला नकार घंटा देत राष्ट्रवादीकडून त्यातून उभे राहिलेले संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी भाजपची संपूर्ण टीम म्हाडा लोकसभा मतदारसंघांमध्ये कामाला लागली आहे माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून पूर्वाश्रमीच्या संजय शिंदे यांना उमेदवारी देऊ केली होती ती मात्र संजय शिंदे यांनी अडीच वर्षे भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहून देखील माढ्यातून भाजपची उमेदवारी नाकारली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी स्वीकारली त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा संजय शिंदे यांच्यावर राग आहे संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी म्हाडा लोकसभा मतदार संघातील अनेकांना भाजप पक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे निवडणुकीच्या तोंडावर दररोज दोन ते तीन जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने दबाव टाकून पक्ष प्रवेश सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केला आहे भाजपने कितीही जोर लावला तरी म्हाडा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवार हा निश्चित झाला असून आता फक्त किती मताधिक्य मिळणार आहे याची उत्सुकता असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी चा बालेकिल्ला असलेल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असून दबाव टाकून अनेकांना पक्ष प्रवेश दिला जात आहे मात्र याचा कोणताही फायदा भाजपला मिळत नसल्याचे सध्याचे चित्र असल्याचे दीपक साळुंखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सध्या जोरदार प्रचार सुरू असून उपचारांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला भाजपला माणसं देखील मिळत नाहीत अशी विदारक परिस्थिती असल्यामुळे ळ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार हा विक्रमी मताधिक्‍याने विजयी होणार असल्याचे दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले तर सोलापूर लोकसभा मतदार संघात देखील सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला आहे तसेच सोलापूर मध्ये काँग्रेसची मुख्य लढत ही वंचित बहुजन आघाडी च्या प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात असून भाजपची लढत नसल्याचेही ही त्यांनी यावेळी सांगितले

Conclusion:वाईट दीपक साळुंखे-पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.