ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाची लस देण्याची चाचणी शुक्रवारी

कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत काल बुधवारी जिल्हा कृतीदल समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी कोरोना चाचणीच्या सूचना दिल्या.

Corona vaccination test in Solapur district on Friday
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची लस देण्याची चाचणी शुक्रवारी
author img

By

Published : Jan 7, 2021, 12:53 AM IST

सोलापूर - राज्यातील चार जिल्ह्यात कोरोना लस देण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात येत्या शुक्रवारी चाचणी घेतली जाणार आहे. लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचारी, डॉक्टर, सपोर्ट स्टाफ यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज बुधवारी दिल्या.

कृतीदल समितीची आढावा बैठक -

कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत काल बुधवारी जिल्हा कृतीदल समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी कोरोना चाचणीच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोविड विषयकचे राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

सोलापुरात कोरोनाची लस देण्याची चाचणी शुक्रवारी

पहिल्या टप्प्यात कोरोना कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार-

जिल्ह्यातील मोठी रुग्णालये निश्चित करावीत. त्या रुग्णालयांना शासनाकडून लस पुरवली जाईल. संबंधित रुग्णालय प्रशासनावर लसीकरणाबाबतची सर्व जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस दिली जाणार नाही. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि आघाडीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्याबाबतची तयारी केली जावी, असे या बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीला यांची उपस्थिती

यावेळी वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुमार ढेले, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.