ETV Bharat / state

Fake Currency Business : लाईफमध्ये सेटल होण्यासाठी चौघांनी सुरू केला बनावट नोटांचा धंदा - बनावट नोटा जप्त

हॉटेल व्यवसाय सुरू करून सुख समाधानाचे आयुष्य जगावे यासाठी एका कॉलेज तरुणाने बनावट नोटा (Fake notes seized) छापण्याचा उद्योग सुरू केला. मात्र पोलिसांच्या पारखी नजरेतून तो सुटू शकला नाही. पोलिसानी बनावट नोट प्रकरणी चार जणांना अटक (four arrested in fake note case) केली आहे. तरुणाला अटक करून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त (Fake notes seized) करण्यात आल्या आहे. (fake currency business). आरोपी हुबेहूब 500 च्या नोटा छापल्यानंतर चौघे ग्राहक शोधत होते. त्यावेळी सोलापूर ग्रामीण क्राईम ब्रँचला याची माहिती मिळाली.

Fake Currency Business
बनावट नोटा जप्त
author img

By

Published : Dec 14, 2022, 1:45 PM IST

बनावट नोटांचा धंदा; पोलिसांना बसला धक्का

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी हद्दीत एका महाविद्यालयीन तरुणाला अटक करून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त (Fake notes seized) केल्या होत्या. ग्रामीण क्राईम ब्रँचने खोलात तपास करून आणखी तिघांना ताब्यात घेतले. चौघांना अटक करून त्यांच्या कडून प्रिंटर, संगणक, नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या चौघांना अटक (four arrested in fake note case) करून अधिक माहिती विचारली असता, त्यांनी आयुष्यात सेटल होण्यासाठी किंवा कोणताही एक व्यवसाय करण्यासाठी हा बनावट नोटांचा उद्योग (fake currency business) सुरू केल्याची माहिती दिली. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती दिली.

बनावट नोटा छापल्या : हर्षल शिवाजी लोकरे (वय 20 वर्ष,रा कंदर,ता करमाळा,जि सोलापूर), सुभाष दिगंबर काळे(वय 36 वर्षे,रा भोसरे,माढा,जि सोलापूर), प्रभाकर उर्फ गणेश सदाशिव शिंदे(वय 38 वर्ष,शाहू नगर,भोसरे,ता माढा,जि सोलापूर), पप्पू भारत पवार(वय 30 वर्ष,रा अर्जुन नगर,ता करमाळा,जि सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पप्पू पवार यांचे डीटीपी संगणक कोर्स झाले आहे. पप्पूने कंदर (ता करमाळा जि सोलापूर) या ठिकाणी आर्यन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली होती. अनेक विद्यार्थ्यांना येथून त्याने संगणकाचे धडे दिले. चार महिन्यांपूर्वी पप्पू पवार , हर्षल लोकरे,सुभाष काळे, प्रभाकर शिंदे हे एकत्र आले आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्लॅनिंग केले. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता म्हणून त्यांनी बनावट नोटा छापून पैसे जमा करण्याचा डाव आखला. पप्पू पवार हा डीटीपीमध्ये तरबेज होता. त्याने पुणे येथील उरुळी कांचन या ठिकाणी भाड्याने खोली घेतली आणि जवळपास 6 लाखांच्या बनावट नोटा छापल्या.

नोटविक्रीसाठी ग्राहकांचा शोध: हुबेहूब 500 च्या नोटा छापल्यानंतर चौघे ग्राहक शोधत होते.त्यावेळी सोलापूर ग्रामीण क्राईम ब्रँचला याची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब बनावट नोटा घेऊन येणाऱ्यावर पाळत ठेवली.3 डिसेंबर रोजी हर्षल लोकरे यास ताब्यात घेऊन 500 रुपयांच्या 493 बनावट नोटा जप्त केल्या.त्याला खाक्या दाखवताच हर्षलने पोपटासारखी माहिती दिली,त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष काळे याला टेम्भुर्णी येथे महामार्गावर 500 रुपयांच्या 580 नोटा जप्त केल्या.त्यानंतर प्रभाकर उर्फ गणेश शिंदे याला अटक करून 500 रुपयांच्या 100 बनावट नोटा जप्त केल्या.अशा प्रकारे पोलिसांनी 5 लाख 86 हजारांच्या बनावट नोटा जप्त करून पोलीस कोठडीत रवानगी केली.हुबेहूब बनावट नोटा छापणाऱ्या पप्पू पवार याला पुण्यातील उरुळीकांचन येथून अटक केले व संगणक,प्रिंटर,व इतर साहित्य जप्त केले.

भलताच उद्योग सुरू केला : चौघांना पैशाची खूप गरज होती. हॉटेल व्यवसाय सुरू करून एक चांगले आयुष्य ते व्यतीत करणार होते. पण व्यवसाय सुरू करण्यासाठी खऱ्या नोटांची गरज होती. ती गरज भागवण्यासाठी या चौघांनी बनावट नोटा छापण्याचा भलताच उद्योग सुरू केला आणि क्राईम ब्रँचच्या हाती लागले. यामध्ये पीआय सुहास जगताप, एपीआय धंनजय पोरे, यांनी दिली. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.