ETV Bharat / state

कॅनरा बॅंकेकडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चार मशीन दान; कृत्रिम श्वासोश्वास घेण्यासाठी उपयूक्त - मिलिंद शंभरकर न्यूज

कॅनरा बँकेच्या क्षेत्रीय कार्यालय, सोलापूरकडून शनिवारी चार बायपोलार रेस्पिरेटरी मशीन देण्यात आल्या. या ही मशीन कोरोना पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास घेण्यास मदत करणारी आहेत. सात लाख रुपये किमतीचे मशीन सामाजिक दायित्व म्हणून देण्यात आलेली आहेत.

Canara bank donate four machine
कॅनरा बॅंकेकडून चार मशीन दान
author img

By

Published : Jul 19, 2020, 12:55 PM IST

सोलापूर - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत कॅनरा बँकेनेदेखील पुढाकार घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार मशीन सिव्हिल हॉस्पिटलला कॅनरा बॅंकेने दान दिल्या आहेत. सोलापुरातील वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे. कॅनरा बॅंकेने दिलेल्या या मशिनमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत मिळणार असल्याचे डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले आहे.

सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांवर उपचार करत असताना काही अडचणीचा सामना देखील शासकीय रूग्णालयाला करावा लागत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरची कमतरता आहे. अशा परिस्थितीमध्ये कॅनरा बॅंकेने मदतीचा हात पुढे करत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलल चार मशीन दान केल्या आहेत. कॅनरा बँकेच्या क्षेत्रीय कार्यालय, सोलापूरकडून शनिवारी चार बायपोलार रेस्पिरेटरी मशीन देण्यात आल्या. या ही मशीन कोरोना पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास घेण्यास मदत करणारी आहेत. सात लाख रुपये किमतीचे मशीन सामाजिक दायित्व म्हणून देण्यात आलेली आहेत.

सोलापूर महानगरपालिकेतर्फे या मशिन श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयास सुपूर्द करण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, कॅनरा बँक क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख के. एस उदय, उपायुक्त अजयसिंह पवार, पंकज जावळे. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कॅनरा बँकेचे आभार व्यक्त केले. या मशीनमुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे सांगितले.महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कॅनरा बँकेच्या या उपक्रमाचे स्वागत केले. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी कॅनरा बँकेच्या उपक्रमाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. या मशीनमुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यास मदत होणार आहे. यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास देखील याची गरज असल्याचे डॉ. संजीव ठाकूर यांनी यावेळी सांगितले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.