ETV Bharat / state

पंढरपूर : भीमा नदी पात्रात एका महिलेसह मुलगा बुडाला; शोधमोहीम सुरू

भीमा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेसह एका मुलगा नदी पात्रात बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. पायल सुग्रीव लोंढे (18) रा. चिंचोली भोसे व जय दत्ता जाधव (12) रा. चिंचोली भोसे, असे वाहून गेलेल्या दोघा जणांची नावे आहेत.

pandharpur latest news
पंढरपूर : भीमा नदी पात्रात एका महिलेसह मुलगा बुडाला; शोधमोहीम सुरू
author img

By

Published : May 28, 2021, 7:39 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे भीमा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेसह एका मुलगा नदी पात्रात बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. पायल सुग्रीव लोंढे (18) रा. चिंचोली भोसे व जय दत्ता जाधव (12) रा. चिंचोली भोसे, असे वाहून गेलेल्या दोघा जणांची नावे आहेत. वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना -

चिंचोली भोसे येथील पायल लोंढे व जय जाधव हे सकाळी अकराच्या सुमारास भीमा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेली असता पायल आणि जय पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे वाहून गेल्याची घटना घडली. सध्या उजनी जलाशयातून भीमा नदीमध्ये 6 हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह वाहताना दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेच स्थानिक युवक व कर्मचार्‍यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.

हेही वाचा - 'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.