सोलापूर - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नका, अशी प्रमुख मागणी करत, भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस परवानगी नसतानाही भाजपच्या वतीने हे निदर्शने आंदोलन करण्यात आले. शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात करण्यात आला होता.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे सरकारने ऐकले नाही
भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आदेश पारित केला होता. तसेच त्यानंतर त्यांनी सध्याच्या सरकारलाही सांगितले होते की, ओबीसीच्या राजकीय आरक्षणसाठी इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात करा. विशेष आयोगाची नेमणूक करुन सर्वोच्च न्यायालय जे माहिती मागत आहे, ती माहिती द्या. पण, या महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने माहिती दिली नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयात कमी पडले. म्हणून ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, असा आरोप भाजप आमदर विजयकुमार देशमुख यांनी केला यावेळी केला.
निदर्शने आंदोलन करताना सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. राजकीय आंदोलन किंवा संमेलनास कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. तरीही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन कोणीही करत नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना पोलिसांसोबत झटापट झाली.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांना संजय राठोड यांचे प्रत्युत्तर.. म्हणाले राजकारणाची पातळी कुठंपर्यंत जाते हे पाहायचंय