ETV Bharat / state

रस्त्यासाठी स्वत:च्या मालकीची दिली जमीन, शेकडो नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटला

अनेक वर्षापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न गावातील एका शेतकऱ्याच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे आता शेकडो नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे.

a farmer donated Land for the road in madha
रस्त्यासाठी स्वत:च्या मालकिच्या दिली जमीन
author img

By

Published : May 15, 2020, 8:14 PM IST

सोलापूर - अनेक वर्षापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न गावातील एका शेतकऱ्याच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे आता शेकडो नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. माढा तालुक्यातील जाधववाडीपासून भाकरे वस्तीला ये-जा करण्यासाठी अनेक वर्षापासून रस्ताच नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र, अखेर हा प्रश्न आता मिटला आहे.

नागरिकांच्या या गैरसोयीचा प्रश्न गावातील महादेव सोपान चव्हाण व सविता महादेव चव्हाण या शेतकरी दाम्पत्याने स्वत:च्या मालकिच्या शेतातील १५ गुंठे क्षेत्र रस्त्यासाठी कसलाही मोबदला न घेता दिले आहे. तसेच गावचे माजी सरपंच अमोल चवरे यांनी व गाव वस्तीवरील नागरिकांनी रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता तयार केला आहे. जाधववाडी गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही भाकरे वस्ती येथे असल्याने सातत्याने शेतकऱ्यांना ये-जा करावे लागत होते. अनेक वर्षापासून हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत होता. शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करत शेतात जावे लागत होते. सध्याच्या मतलबी युगात महादेव चव्हाण या शेतकऱ्याने दानत दाखवत गट नंबर १८/२ मधील स्वतः चे १५ गुंठे क्षेत्र रस्त्यासाठी मोबदला न घेता दिल्याने त्यांचे गावातून कौतुक होते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.