ETV Bharat / state

सोलापुरात 42 कोरोनाग्रस्तांची वाढ, तिघांचा मृत्यू

सोलापुरात बुधवारी (दि. 10 जून) 42 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. बाधितांची संख्या 1 हजार 310 वर पोहोचली आहे.

solapur
सोलापूर महापालिका
author img

By

Published : Jun 11, 2020, 10:41 AM IST

सोलापूर - कोरोनाची बाधा झाल्याने सोलापुरात एका ज्येष्ठ वकील व एका गिरणी कामगारांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. हे सर्व मृत साठीच्या पुढचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वृद्धावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी (दि. 10 जून) दिवसभरात महापालिका हद्दीत 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 310 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेले जेष्ठ वकील हे 89 वर्षांचे होते. स्वप्नपूर्ती सर्वोदय हौसिंग सोसायटी परिसरातील घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्‍यास मार लागला होता. त्यांनी खासगी डॉक्‍टरकडे उपचार घेतले. पण, त्यांची प्रकृती न सुधारल्याने त्यांना शहरातील अश्‍विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा एक्‍स-रे काढला असता, यावेळी त्यांना न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट झाले.

भारतरत्न इंदिरानगर येथील गिरणी कामगार 63 वर्षांचे होते. त्यांची यापूर्वी ऍन्जिओग्राफी झाली होती. त्यांच्यावरही अश्‍विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. रामराज्यनगर, शेळगी येथील महिला 67 वर्षांची होती. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे यापूर्वी तीन वेळा डायलिसिस करण्यात आले होते. या वयोवृद्ध तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

महापालिकेतील कर्मचारी तथा एका कामगार नेत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यात आज आणखी एका कामगार नेत्याची भर पडली. कोरोनाची लागण झालेले एक नगरसेवक, एक नगरसेविका, नगरसेविकेचे पती आणि त्यांचे कुटुंबीय सध्या कोरोनामुक्त झाले आहेत. उच्चपदस्थ पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खासगी आणि रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असून, त्यांनाही घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बुधवारी (दि. 10 जून) 362 अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 320 अहवाल निगेटिव्ह आले, तर 42 अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 49 जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आज तीन जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये अश्‍विनी रुग्णालयातील दोन, तर गंगामाई रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 8 हजार 400 व्यक्तींच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 279 जणांचा अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालापैकी 6 हजार 969 अहवाल निगेटिव्ह, तर 1 हजार 310 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 121अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

हेही वाचा - सांगोल्यात नीरा उजवा कालव्याचे विभागीय कार्यालय सुरू करणार - आमदार मोहिते-पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.