ETV Bharat / state

सोमैयांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण करून दिल्याने सेना-भाजपा आमनेसामने

कालपासूनच जिल्ह्यात सोमैया दाखल होणार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल बोलणार अशा बातम्या माध्यमातून येत असतानाच शिवसेनेने सोमैया यांच्या नारायण राणे यांच्या विरोधात आलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ क्लिप थेट प्रोजेक्टरवर दाखवायला सुरुवात केली.

shivsena bjp clashes
shivsena bjp clashes
author img

By

Published : Sep 3, 2021, 2:57 PM IST

Updated : Sep 3, 2021, 5:29 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवलीत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. आज भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया आमदार नितेश राणे यांच्यासोबत दाखल झाले. कालपासूनच जिल्ह्यात सोमैया दाखल होणार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल बोलणार अशा बातम्या माध्यमातून येत असतानाच शिवसेनेने सोमैया यांच्या नारायण राणे यांच्या विरोधात आलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ क्लिप थेट प्रोजेक्टरवर दाखवायला सुरुवात केली. यामुळे वातावरण तापले आहे.

shivsena bjp clashes
shivsena bjp clashes

कणकवलीत तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला

कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने “किरीट सोमैया तुम्ही बोलला त्याचे काय झाले? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय” या मथळ्याखाली एलईडी स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर नारायण राणे यांच्याबद्दल किरीट सोमैया यांनी केलेल्या त्यावेळच्या आरोपांबद्दल आठवण करून देणारी स्क्रिन याठिकाणी लावल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून, सोमैया यांचे स्वागत करत असताना शिवसेनेने अशा प्रकारे केलेल्या या स्टंटसाठी परवानगी घेतली आहे का? तसे असेल तर दहा मिनिटे वाट पाहू, अन्यथा आम्ही या ठिकाणी एलईडी स्क्रीन किंवा डीजे लावू, असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.

दंगल नियंत्रण पथक तैनात

कणकवली शिवसेना शाखेसमोर भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. त्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सज्ज केली आहे. मात्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या किरीट सोमैया यांचे कणकवलीत आगमन झाले आहे.

Last Updated : Sep 3, 2021, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.