ETV Bharat / state

'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा' अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा' व 'सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन'च्या संयुक्त विद्यमाने नवोदित वकिलांसाठी सिंधुदुर्ग नगरीतील शरद कृषी भवन येथे एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सिंधुदुर्ग येथे एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन

author img

By

Published : Jan 28, 2020, 11:42 AM IST

सिंधुदुर्ग - सर्वसामान्य गोरगरीब माणसाला योग्य पद्धतीने न्याय कसा मिळेल, या दृष्टीने आजच्या नवोदित व वरिष्ठ वकिलांनी नव्या तंत्रज्ञानाचे नवे कायदे अभ्यासायला हवेत. यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने होणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळेतून नवोदित वकिलांना कायद्याबाबत अधिक माहिती होण्याला मदत होणार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यानी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग येथे एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन

'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र' आणि 'गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन'च्या संयुक्त विद्यमाने नवोदित वकिलांसाठी सिंधुदुर्ग नगरीतील शरद कृषी भवन येथे एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्या हस्ते या कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील कोतवाल, गोवा राज्याचे अ‌ॅड. जनरल देविदास पांगम, बार कौन्सिल सदस्य गजानन चव्हाण, अ‌ॅड. सुधाकर आव्हाड, अ‌ॅड. जयंत जयभावे, रत्नागिरी बार असोसीएशन अध्यक्ष अशोक कदम, अ‌ॅड. विवेकानंद घाडगे, 'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा'चे सदस्य अ‌ॅड. संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष अ‌ॅड. राजेंद्र रावराणे आदी उपस्थित होते.

आजच्या बदलत्या काळात वकिली क्षेत्रासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. अशा स्थितीत नवोदित वकिलांना कायद्याची व नव तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यांनी ती जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गोरगरीब सर्वसामान्य माणसाला योग्य पद्धतीने न्याय कसा मिळेल या दृष्टीने नवोदित वकिलांनी अभ्यास करायला हवा. अशा कार्यशाळेतून खूप काही शिकता येते, त्यामुळे याचा लाभ नवोदित वकिलांनी घ्यावा असे आवाहन केले.

निवृत्त न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले, आज स्पर्धेच्या युगात नवे तंत्रज्ञान, नवनवे कायदे अंमलात येत आहेत. अशा स्थितीत वकिलांना याची माहिती होण्यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने घेतल्या गेल्या तर, निश्चितपणे वकिलांना त्याबाबत फायदा होईल. महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन आणि जिल्हा बार असोसिएशनने पुढाकार घेऊन केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

हेही वाचा - देशातील पहिल्या नैसर्गिक कृषी प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात उद्घाटन

अ‌ॅड संग्राम देसाई म्हणाले, सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे वकिलाचे आद्य कर्तव्य आहे. या कार्यशाळेतून विचारांचे आदान प्रदान होऊन वकिलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे वेगळे नसून एकच आहेत. 'महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन'च्या निवडणुकीत सिंधुदुर्गातून सर्वांच्या सहकार्यामुळे मी निवडून आलो. सिंधुदुर्गबरोबरच रत्नागिरीनेही चांगले सहकार्य केले. त्याचाच पारिपाक म्हणून ही कार्यशाळा होत आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातही अशीच कार्यशाळा घेतली जाईल. पैसा म्हणजे सर्वस्व नाही तर, गोरगरीब सर्वसामान्यांच्या समस्या सामाजिक भावनेतून कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न करावा. यावेळचे मार्गदर्शन यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा - सिंधुदुर्गमध्ये बचतगटाच्या महिलेकडून शिवभोजन थाळीचे उद्घाटन, पालकमंत्र्यांचीही उपस्थिती

Intro:अँकर /-सर्वसामान्य गोरगरीब माणसाला योग्य पद्धतीने न्याय कसा मिळेल या दृष्टीने आजच्या नवोदित व सीनियर वकीलानी नव्या तंत्रज्ञानाचे नवे कायदे अभ्यासायला हवेत. यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने होणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळेतून नवोदित वकिलांना कायद्याबाबत अधिक माहिती होण्याला मदत होणार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी. व्ही. भडंग यानी व्यक्त केले. 
Body:V /O /- बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने नवोदित वकिलांसाठी सिंधुदुर्गनगरीतील शरद कृषी भवन येथे एक दिवशीय कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्या हस्ते या कार्यशााळेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनिल कोतवाल, गोवा राज्याचे ऍड. जनरल देविदास पां गम, बार कौन्सिल सदस्य गजानन चव्हाण, ऍड सुधाकर आव्हाड, ऍड जयंत जयभावे, रत्नागिरी बार असोसीएशन अध्यक्ष अशोक कदम, ऍड. विवेकानंद घाडगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा चे सदस्य ऍड संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष ऍड. राजेंद्र रावराणे आदी उपस्थित होते.
  आजच्या बदलत्या काळात वकिली क्षेत्रासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. अशा स्थितीत नवोदित वकिलांना कायद्याचे व नव तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे नव्हे तर त्यांनी ती जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. गोरगरीब सर्वसामान्य माणसाला योग्य पद्धतीने न्याय कसा मिळेल या दृष्टीने नवोदित वकिलांनी अभ्यास करायला हवा आणि अशा कार्य शाळेतून खूप काही शिकता येते. त्यामुळे याचा लाभ नवोदित वकिलांनी घ्यावा असे आवाहन केले. 
 निवृत्त न्यायमूर्ती श्री. कोतवाल यानी आज स्पर्धेच्या युगात नवं तंत्रज्ञान येत आह.नवनवे कायदे अंमलात येत आहेत. अशा स्थितीत वकिलांना याची माहिती होण्यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने घेतल्या गेल्या तर निश्चितपणे वकिलांना त्याबाबत फायदा होईल. महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन आणि जिल्हा बार असोसिएशनने पुढाकार घेऊन केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारहि त्यांनी काढले. 
ऍड संग्राम देसाई म्हणाले की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळऊन देण हे वकीलाचं आद्य कर्तव्य आहे. या कार्यशाळेतtन विचाराbचे आदान प्रदान होऊन वकीलांच्या ज्ञानात नक्काrच भर पडेल असा विMवास देसाई याbनी व्यक्त केला. रlनागिरी आणि सिंधुदुर्ग हे वेगळे नसून एकच आहेत. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन च्या निवडणुकीत सिंधुदुर्गा तून सर्वाच्या सहकार्यामुळे मी निवडून आलो. सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरीने ही चांगले सहकार्य केले. त्याचाच पाfरपाक म्हणून ही कार्यशाळा होत आहे. लवकरच रlनागिरी जिल्हय़ाातहि अशीच कार्यशाळा घेतली जाईल. पैसा म्हणजे सर्वस्व नाही तर गोरगरीब सर्वसामान्यांच्या समस्या सामाजिक भावनेतून कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न करावा. यावेळचे मार्गदर्शन यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.