सिंधुदुर्ग - कोरोनाच्या संकट काळात हातावर पोट असलेल्या आदिवासी कातकरी मजूर कुटुंबांना कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कणकवली गणपती साना येथील शांतीनगरमध्ये राहणारे आदिवासी कातकरी बांधव मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या कोरोनाच्या संकट काळात त्यांचा रोजगार पुरता बुडाला आहे. त्यांना थोडी मदत व्हावी, या हेतूने कणकवलीतील काही सजग नागरिक एकत्र आले आणि त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी कणकवलीचे तहसीलदार पवार, डॉ. विद्याधर तायशेट्ये, गुरू काळसेकर, नामानंद मोडक, विनायक सापळे, बाळू मेस्त्री, हनिफ पिरखान, योगेश सावंत, अशोक करंबेळकर, शैला कदम आदी उपस्थित होते.
आदिवासी कातकरी बांधवांच्या 15 कुटुंबाना या संकट काळात दर आठवडयाला जीवनावश्यक वस्तू देणार असल्याचे यावेळी उपस्थित कणकवलीकर नागरिकांनी सांगितले.