ETV Bharat / state

राणे म्हणतात मी विकासाच्या मुद्यावर आक्रमक, पालकमंत्री म्हणाले बाचाबाची झालीच नाही - सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठक

पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत राणे आणि राऊत यांच्यात कोणतीही बाचाबाची झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नारायण राणे खासदार म्हणून त्यांची भूमिका मांडत होते, तर विनायक राऊत आपली भूमिका मांडत होते.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Jan 28, 2021, 10:38 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा नियोजनाच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासाच्या मुद्यावर मी आक्रमक झालो होतो, अशी भूमिका आजच्या बैठकीनंतर खासदार नारायण राणे यांनी मांडली. तर कोणतीही बाचाबाची झाली नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंती उदय सामंत यांनी दिले आहे. त्यामुळे आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर नेत्यांनी सारवासारव केली असली तरी राणे आणि राऊत एकमेकांना भिडल्याने काही काळ राजकारण चांगलेच तापले होते.

सिंधुदुर्ग

मी विकासाच्या मुद्यावर आक्रमक झालो - नारायण राणे

जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आषेप घेतल्यामुळे वाद झाला. या वादावर आता खासदार नारायण राणे यांनी भूमिका मांडली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर मी आक्रमक होतो. गेली वर्षभर अपेक्षीत निधी आला नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. या गोष्टी आम्ही आज मांडल्या, विकासाला निधी येत नसेल, खर्च होत नसेल तर जिल्हा नियोजनचा उपयोग काय हा आमचा प्रश्न आहे? पालकमंत्र्यानी फंड आणावा आणि खर्च करावा ही आपली भूमिका असल्याचा आक्रमक पवित्रा राणेंनी घेतला आहे.

कोणतीही बाचाबाची झाली नाही - पालकमंत्री

तर पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत राणे आणि राऊत यांच्यात कोणतीही बाचाबाची झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नारायण राणे खासदार म्हणून त्यांची भूमिका मांडत होते, तर विनायक राऊत आपली भूमिका मांडत होते. आजच्या बैठकीत थोडीफार तात्विक मतभेद नक्की झाले. मात्र, कुठेही वादावादी झाली नाही उलट खेळी-मेळीच्या वातावरणात बैठक पार पडली असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.