ETV Bharat / state

सचिन वाझे, परमबीरसिंह यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच 'गॉडफादर'

आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वाझे आणि परमबीरसिंह यांचे उद्धव ठाकरेच 'गॉडफादर' असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या चौकशीसह राजीनाम्याची मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Mar 18, 2021, 6:06 PM IST

Updated : Mar 18, 2021, 6:41 PM IST

सिंधुदुर्ग - सचिन वाझे प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वाझे आणि परमबीरसिंह यांचे उद्धव ठाकरेच 'गॉडफादर' असल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशीसह राजीनाम्याची मागणी केली आहे.

राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. सचिन वाझेंची मर्सिडीज मोटार संजय राऊत यांच्या भावाच्या कार्यालयाबाहेर काय करत होती? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, असे सांगून त्यांचा हमाम वेगळा आहे आणि आमचा हमाम वेगळा आहे, असे विधान केले आहे. नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये पत्रकारांशी बोलताना हे आरोप केले.

वरुण देसाई यांचे मी नाव घेतले

सचिन वाझे प्रकरणात वरुण देसाई यांचे मी नाव घेतले आहे. आता सचिन वाझे यांची मर्सिडीज कुठे होती, हे देखील मी सांगितले आहे. सरकारने त्याबाबत काय भूमिका घेतली आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. मुळामध्ये संजय राऊत यांच्या आमदार असलेल्या भावाच्या कार्यालयाबाहेर ती मर्सिडीज काय करत होती? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, असे आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.

सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही प्यादी आहेत

सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही प्यादी आहेत. त्यांचा 'गॉडफादर' वेगळा आहे. या घटनेचा सूत्रधार काही वेगळा आहे. याच सचिन वाझेंसाठी सेना-भाजप युतीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला होता. त्यानंतर आता एका प्रश्नावर बोलताना सचिन वाझे हा काही ओसमा बिन लादेन आहे का? असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे वाझे यांचा गॉडफादर कोण हे लक्षात आलेले आहे.

उद्धव ठाकरे सचिन वाझेंची वकिली करत होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांची वकिली करत होते. त्यांची वकिली करण्यामागचे कारण काय? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे अनेकांची नावे समोर येतील आणि आता सूत्रधारही समोर येईल. सचिन वाझे यांनी हा सगळा कट 'पब्लिसिटी'साठी केला की अन्य कुणाच्या 'पब्लिसिटी'साठी केला ते लवकरच समोर येईल, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

Last Updated : Mar 18, 2021, 6:41 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.