सिंधुदूर्ग - युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात त्यांनी भेट दिली. ठाकरे यांनी शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना भाताच्या पेंढ्याची मुळी देऊन त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा - शेतकरी अडचणीत असताना सत्ता स्थापनेचं स्वप्न पाहणे चुकीचे - उद्धव ठाकरे
ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विनंती केली की, झालेल्या नुकसानीमुळे खचून जाऊ नका. तसेच स्वत:ही काही बर वाईट करू घेऊ नका. असा मनात विचार आला तर शिवसेनेला हाक मारा आम्ही तुमच्या सोबत उभे राहू. असा दिलासा यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. पण नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, व स्थानिक आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
हेही वाचा - वंचितकडे वळलेला वर्ग आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करा - शरद पवार