ETV Bharat / state

'यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात अच्छे दिन शोधावे लागत आहेत'

author img

By

Published : Oct 12, 2019, 9:56 PM IST

कराड येथील आझाद चौकात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, चंद्रकांत मुळे, कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, रमेश जगदाळे, मजहर कागदी, नईम कागदी, माजी नगरसेवक विजय मुठेकर उपस्थित होते.

विलासकाका उंडाळकर

सातारा - ज्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. तो महाराष्ट्र आज कुठे आहे, असे खेदाने विचारावे लागत आहे. देशात आज प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. नोटबंदी, जीएसटी आणि बँकांच्या दिवाळखोरीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात अच्छे दिन शोधावे लागत आहेत, अशा शब्दांत माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांनी भाजपवर शरसंधान साधले.

हेही वाचा - उदयनराजेंनी जनतेचा विश्वासघात केला; श्रीनिवास पाटील यांचे टीकास्त्र

देशात आणि राज्यात सर्वच बाबतीत भयावह परिस्थिती असल्याचे सांगून उंडाळकर म्हणाले, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेतृत्वाने पुरोगामी महाराष्ट्र उध्वस्त करण्याचे पाप केले. त्यामुळेच राज्यात काँग्रेससारख्या पक्षाची आज दुरावस्था झाली आहे. प्रशासकीय इमारती बांधून विकास होत नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना किती उद्योग आणले आणि किती लोकांना रोजगार दिला, हे सांगा, असे उंडाळकर म्हणाले.

विद्यमान आमदारांसह सत्तेच्या गोटात असलेल्या भाजप उमेदवाराकडून मागील 5 वर्षात विकासाच्या नावाखाली फक्त कराडकरांची फसवणूक झाल्याची टीका अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केली. सामान्यांचे प्रश्न आजही कायम असून जनतेने उठाव केल्यामुळे कराड दक्षिणच्या जनतेचा कल परिवर्तनाच्या बाजूने आहे. कराड दक्षिणच्या निवडणुकीत आपल्या विरोधात असलेल्या सरंजामदार व भांडवलदारांनी लोकांच्या प्रश्नापेक्षा सत्तेतून पैसा व पैशातून सत्तेचे राजकारण केले.

हेही वाचा - सत्तेत असताना युवकांसाठी किती रोजगार आणले? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

मागील 5 वर्षात शहर आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांकडे त्यांनी डोळेझाक केल्यामुळे विकासाची गती मंदावली आहे. त्यामुळे मागील 35 वर्षांप्रमाणे कराड दक्षिणला सामान्यांचे प्रश्न समजून घेणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. जनतेच्या रेट्यामुळे रयत संघटनेमार्फत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. विलासकाकांनी सामान्यांचे प्रश्न जाणून आणि मतदार संघातील गरज ओळखून रचनात्मक विकास केला. त्यामुळेच जनतेने त्यांना सलग 35 वर्षे आपला प्रतिनिधी म्हणून विधीमंडळात पाठविले. या निवडणुकीत विलासकाकांच्या काळातील विकासाचे पर्व पुन्हा आणण्यासाठी आपण मला साथ द्यावी, असे उदयसिंह पाटील म्हणाले.

Intro:ज्या स्व. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली, तो महाराष्ट्र आज कुठे आहे, असे खेदाने विचारावे लागत आहे. देशात आज प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. नोटबंदी, जीएसटी आणि बँकांच्या दिवाळखोरीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात अच्छे दिन शोधावेे लागत आहेत, अशा शब्दांत माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांनी भाजपवर शरसंधान साधले. Body:कराड (सातारा) : ज्या स्व. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली, तो महाराष्ट्र आज कुठे आहे, असे खेदाने विचारावे लागत आहे. देशात आज प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. नोटबंदी, जीएसटी आणि बँकांच्या दिवाळखोरीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात अच्छे दिन शोधावेे लागत आहेत, अशा शब्दांत माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांनी भाजपवर शरसंधान साधले. 
      कराड येथील आझाद चौकात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, चंद्रकांत मुळे, कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, रमेश जगदाळे, मजहर कागदी, नईम कागदी, माजी नगरसेवक विजय मुठेकर उपस्थित होते. 
     देशात आणि राज्यात सर्वच बाबतीत भयावह परिस्थिती असल्याचे सांगून उंडाळकर म्हणाले, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेतृत्वाने पुरोगामी महाराष्ट्र उध्वस्त करण्याचे पाप केले. त्यामुळेच राज्यात काँग्रेससारख्या पक्षाची आज दुरावस्था झाली आहे. प्रशासकीय इमारती बांधून विकास होत नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना किती उद्योग आणले आणि किती लोकांना रोजगार दिला, हे सांगा. माझी विचारांची लढाई आहे. 2009 ला पहिल्यांदा कराड शहर दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ट झाले. त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांना थेट कराड नगरपालिकेत आणून त्रिशंकू भागाची हद्दवाढ, घरकुलाचे प्रश्न, रस्त्यांसाठी 2 कोटींचा निधी व घनकचरा प्रकल्पासाठी 25 एकर जागा मंजूर करून घेतली. परंतु, 25 एकर जागा या लोकांना राखता आली नाही. कराड शहराला ऐक्य, सामाजिक स्वास्थ्य व विकासाची भूक आहे. म्हणून रयत संघटनेने स्वातंत्र्य सैनिकाचा नातू असलेल्या अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदयसिंहाचा विजय हा महाराष्ट्राच्या राजकारणात कलाटणी देणारा ठरेल. दृव. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार जतन करण्यासाठी कराडच्या जनतेने उदयसिंह यांना साथ द्यावी, असे उंडाळकर म्हणाले. 
   विद्यमान आमदारांसह सत्तेच्या गोटात असलेल्या भाजप उमेदवाराकडून मागील पाच वर्षात विकासाच्या नावाखाली फक्त कराडकरांची फसवणूक झाल्याची टीका अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केली. सामान्यांचे प्रश्न आजही कायम असून जनतेने उठाव केल्यामुळे कराड दक्षिणच्या जनतेचा कल परिवर्तनाच्या बाजूने आहे. कराड दक्षिणच्या निवडणुकीत आपल्या विरोधात असलेल्या सरंजामदार व  भांडवलदारांनी लोकांच्या प्रश्नापेक्षा सत्तेतून पैसा व पैशातून सत्तेचे राजकारण केले. मागील पाच वर्षात शहर आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांकडे त्यांनी डोळेझाक केल्यामुळे विकासाची गती मंदावली आहे. त्यामुळे मागील 35 वर्षांप्रमाणे कराड दक्षिणला सामान्यांचे प्रश्न समजून घेणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. जनतेच्या रेट्यामुळे रयत संघटनेमार्फत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. विलासकाकांनी सामान्यांचे प्रश्न जाणून आणि मतदार संघातील गरज ओळखून रचनात्मक विकास केला. त्यामुळेच जनतेने त्यांना सलग 35 वर्षे आपला प्रतिनिधी म्हणून विधीमंडळात पाठविले. या निवडणुकीत विलासकाकांच्या काळातील विकासाचे पर्व पुन्हा आणण्यासाठी आपण मला साथ द्यावी, असे उदयसिंह पाटील म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.