ETV Bharat / state

OBC Reservation : उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भाजपच्या आंदोलनाकडे पाठ

साताऱ्यातही आज ९ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठ फिरवली आहे.

author img

By

Published : Jun 26, 2021, 4:22 PM IST

bjp agitation for OBC Reservation
OBC Reservation : उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भाजपच्या आंदोलनाकडे पाठ

सातारा - ओबीसी आरक्षणासाठी आज भाजपातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. साताऱ्यातही आज ९ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भाजपाच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश असताना हे आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया

हेही वाचा - अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाही; वकिलाची माहिती

'भविष्यात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे' -

ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवे होते. ते केले गेले नाहीत. याचा निषेध करण्यासाठी तसेच भविष्यात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोघेही शहरात उपस्थित नसल्याने या आंदोलनाला हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती विनायक पावसकर यांनी दिली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन -

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसीचे आरक्षण रद्द झाले असून राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर यामध्ये आता ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने यात मुद्दा चिघळला आहे. या परिस्थितीत या निवडणुका रद्द व्हाव्यात, अशी भूमिका भाजपच्यावतीने घेण्यात आली आहे. यासाठी आज राज्यभरात जवळपास एक हजार ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या निवडणुका रद्द कराव्यात गरज पडल्यास राजसरकारने सुप्रीम कोर्टात जावे, अशी मागणी भाजपकडून केल्या जात आहे.

हेही वाचा - सूत्रे आमच्या हाती द्या, तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो.. नाहीतर राजकीय संन्यास घेईल - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.