ETV Bharat / state

Accident News : खंबाटकी घाटात बर्निंग कंटेनरचा थरार;  धुराच्या लोटामुळे वाहतूक काही वेळ ठप्प

पुणे बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटात भर दुपारी दोन कंटेनर पेटल्याने महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार ( Thrill of burning containers ) पहायला मिळाला. आगीच्या ज्वाला आणि धुराच्या लोटामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. ( fortunately averted loss of life )

Accident News
खंबाटकी घाटात बर्निंग कंटेनरचा थरार
author img

By

Published : Jan 9, 2023, 12:23 PM IST

खंबाटकी घाटात बर्निंग कंटेनरचा थरार

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटात दोन कंटेनर पेटले. ( Khambataki Ghat satara ) आगीच्या ज्वाला आणि धुराच्या लोटामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चित्रपटात शोभेल अशी ही घटना होती. ( Khambataki Ghat satara )

दुसऱ्या कंटेनरनेही घेतला पेट : महामार्गावरील खंबाटकी घाटात दुपारी एका कंटेनरने पेट घेतला. त्या कंटेनरचे पेटते चाक निखळून पाठीमागे असलेल्या दुसऱ्या कंटेनरवर जाऊन आदळले. त्यामुळे त्या कंटेनरलाही आग लागली आणि महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार सुरू झाला. विकेंड संपल्याने मोठ्या संख्येने वाहने मुंबई, पुण्याकडे निघाली होती. आगीच्या घटनेमुळे वाहतूक बराच काळ ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. ( fortunately averted loss of life )

कामामुळे वेग घटला : सध्या पुणे बंगळुरू महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. चार पदरी असणारा महामार्ग सहापदरी होणार आहे. त्यामुळे हायवेकडेची झाडे तोडली जात आहेत. त्यासाठी वाहतूक थांबविण्यात येते. तसेच अवजड सामग्रीमुळेही वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. अशातच दोन कंटेनर पेटल्याने खंबाटकी घाटात चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. ( Accident News )

खंडाळा पोलिसांची तत्परता : खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनर पेटल्याची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्यातील फौजदार पी. डी. घनवट, अंमलदार पवार, मनोज गायकवाड, कदम, डेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदतकार्य सुरू केले. वाई तसेच एशियन पेंट कंपनीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करून आग आटोक्यात आणली.

महामार्गावर अपघात : पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडच्या नवीन कोयना पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघातात ( Truck bike accidents ) नितीन कुंभार हा ७ वर्षांच्या मुलगा जागीच ठार झाला आहे. तर त्याचे आजी-आजोबा जखमी ( Grandson killed and grandparents injured ) झाले आहेत. आराध्य हा आजी-आजोबा सोबत दुचाकीवरून पाटणकडे निघाला होता. नवीन कोयना पुलावर मालट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आराध्यचा जागीच मृत्यू झाला तर आजी-आजोबा जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळकृष्ण मारुती कुंभार आणि कुसूम बाळकृष्ण कुंभार राहणार सांगवड, तालुका पाटण असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.