ETV Bharat / state

जेवण का दिले नाही म्हणून आईशी भ‍‍ांडणाऱ्या पित्याचा चाकूने भोसकून खून - सातारा क्राईम

जेवण का दिले नाही म्हणून आईशी भ‍‍ांडणाऱ्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलासह आईवर गुन्हा दाखल झाला आहे.

शाहूपुरी पोलीस स्टेशन
शाहूपुरी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Sep 15, 2021, 7:50 AM IST

सातारा - जेवण का दिले नाही म्हणून आईशी भ‍‍ांडणाऱ्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलासह आईवर गुन्हा दाखल झाला आहे.

जेवण का दिले नाही म्हणून आईशी भ‍‍ांडणाऱ्या पित्याचा चाकूने भोसकून खून

वादाचे पर्यावसान खूनात -

बबन पांडुरंग पवार (वय ५६, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बबन पवार आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण का दिले नाही, असे बबन पवार पत्नीला विचारत होते. यातूनच वाद विकोपाला गेला. मुलगा सुरज पवार आणि त्यांची पत्नी वर्षा हे दोघे त्यांच्याशी वाद घालत होते. याचवेळी त्यांचा मुलगा सुरजने घरातील चाकू हातात घेऊन आला. वडील बबन पवार यांच्या काखेच्या खाली चाकूने वार केले.

उपचारापूर्वीच मृत्यू -

बबन पवार हे रक्तबंबाळ होउन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना त्यांचे भाऊ राजू पवार यांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. बबन पवार यांचे भाऊ राजू पवार यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांनी मुलगा सुरज आणि त्यांची पत्नी वर्षां यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.