ETV Bharat / state

सलून, ब्युटी पॉर्लर दुकाने उघडण्यास परवानगी, पण 'या' आहेत अटी...

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. एका वेळी दुकानात एकच ग्राहक यासारख्या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.

satara district collector permission to salons and beauty parlours open
सलून, ब्युटी पॉर्लर दुकाने उघडण्यास परवानगी, पण 'या' आहेत अटी...
author img

By

Published : May 23, 2020, 8:03 PM IST

सातारा - जिल्ह्याचा नॉन रेड झोनमध्ये समावेश झाल्याने, जिल्ह्यात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही अंशी सूट देण्यात आली आहे. यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. एका वेळी दुकानात एकच ग्राहक यासारख्या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.

वाचा काय आहे अटी...

  • सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही, त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणारी व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे.
  • सलून, पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे.
  • एका ग्राहकाला वापरलेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. त्यासाठी ग्राहकांच्या संख्ये इतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी.
  • काही सलून/ पार्लरमध्ये येणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.
  • केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. त्यात क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी.
  • दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी.
  • केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी.
  • पहिल्या ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा.
  • केशकर्तनालय, ब्युटी पार्लरमध्ये कारागीर व ग्राहक अशा दोन व्यक्तीच दुकानात असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.

दरम्यान, दिलेल्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर तसेच दुकानात गर्दी दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

हेही वाचा - वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांमुळे साताऱ्याजवळ साकारणार फुलपाखरांचं गाव !

हेही वाचा - साताऱ्यात एकाच दिवशी तब्बल 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकाचा आधीच झाला मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.