ETV Bharat / state

सातारा जिल्हा बँक निवडणूक : सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी दंड थोपटले, उंडाळकर पुत्राला देणार आव्हान - Balasaheb Patil

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत कराड तालुका कृषी विषयक विकास सेवा संस्था अर्थात सोसायटी मतदार संघातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रथमच दंड थोपटले आहेत. या मतदार संघातील मतदारांना पत्र पाठवून पाठींबा आणि सहकार्याची विनंती सहकार मंत्र्यांनी केली आहे.

Satara District Bank Election : cooperation minister Balasaheb Patil  will challenge Undalkar's son
सातारा जिल्हा बँक निवडणूक
author img

By

Published : Aug 27, 2021, 6:33 AM IST

कराड (सातारा) - नाबार्डचे अनेक पुरस्कार पटकावत सहकार क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत कराड तालुका कृषी विषयक विकास सेवा संस्था अर्थात सोसायटी मतदार संघातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रथमच दंड थोपटले आहेत. या मतदार संघातील मतदारांना पत्र पाठवून पाठींबा आणि सहकार्याची विनंती सहकार मंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे सहकार मंत्री विरूध्द उंडाळकर पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील, अशी लढत पाहायला मिळणार का, याची संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता आहे.

सलग पाचवेळा आमदार, पण...

बाळासाहेब पाटील हे 1999 पासून कराड उत्तरचे आमदार आहेत. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाचवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. दिवंगत पी. डी. पाटील यांनी देखील 1980 (काँग्रेस) आणि 1995 मध्ये (अपक्ष) विधीमंडळात कराड उत्तरचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, आजपर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात त्यांना स्पेस नव्हती. पी. डी. पाटील यांनी कराड नगरपालिका, कराड उत्तर विधानसभा मतदार संघ आणि सह्याद्री साखर कारखान्याचे नेतृत्व केले. गेली वीस वर्षे आमदार असूनही बाळासाहेब पाटील यांना जिल्हा बँकेच्या राजकारणात स्थान नव्हते. स्वीकृत संचालक म्हणून त्यांचा जिल्हा बँकेत प्रवेश झाला.

विलासकाका उंडाळकरांकडे होते एकहाती नेतृत्व...

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीचे श्रेय दिवंगत विलासकाका उंडाळकरांना दिले जाते. नाबार्डचे अनेक पुरस्कार पटकावण्यासह बँक देशात अग्रस्थानी ठेवण्यात त्यांच्या कडक शिस्तीचा मोठा वाटा राहिला आहे. कराड तालुका सोसायटी मतदार संघातून विलासकाका 1967 पासून 2021 पर्यंत संचालक होते. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. तरीही बँकेत त्यांनी पक्षीय राजकारणाला स्थान दिले नव्हते. बँकेत सर्वात जास्त संचालक हे राष्ट्रवादीचेच होते आणि आजही आहेत. स्वत:च्या रयत सहकारी साखर कारखान्याला देखील विलासकाकांनी जिल्हा बँकेचे कर्ज घेतले नव्हते. त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यातील कारखान्यांना कर्ज देऊ दिले नव्हते. 4 जानेवारी रोजी विलासकाका उंडाळकरांचे निधन झाले. आता त्यांचे सुपूत्र आणि जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे सोसायटी मतदार संघातून दावेदार आहेत.

सहकार मंत्र्यांना बँकेचे संचालक होण्याची तीव्र इच्छा...

ज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना गोकुळचे संचालकपद हे प्रतिष्ठेचे वाटते. त्याप्रमाणे सातार्‍यातील नेते जिल्हा बँकेचे संचालक होण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतात. गेली 45 वर्षे कराड उत्तरला जिल्हा बँकेच्या राजकारणात स्थान नव्हते. स्वीकृत संचालक म्हणून बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने ते स्थान मिळाले. तथापि, मागच्या दाराने नाही, तर निवडून येऊन बँकेच्या राजकारणात प्रवेश करण्याची बाळासाहेब पाटील यांची इच्छा आहे. त्यातच ते सहकार मंत्री आणि सातार्‍याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या इच्छेने आणखी उचल खाल्ली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून त्यांनी आपली उमेदवारी अप्रत्यक्षरित्या जाहीर करून मतदारांशी संपर्क साधायला सुरूवात केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांकरवी मतदारांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू केला आहे.

रामराजे नाईक-निंबाळकरांची भूमिका महत्वाची...

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर आणि प्रयत्न असणार आहे. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती आणि ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जिल्हा बँकेत अनेक वर्षे विलासकाका उंडाळकर, रामराजे नाईक-निंबाळकर आणि लक्ष्मणराव पाटील यांच्या सहमतीने कामकाज चालले. यातील विलासकाका आणि लक्ष्मणराव पाटील हयात नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ संचालक आणि पवार कुटुंबांचे विश्वासू म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मताला महत्व असणार आहे.

कराड सोसायटी मतदार संघ ठरणार कळीचा...

कराड सोसायटी मतदार संघातून जिल्हा बँकेचे संचालक राहिलेल्या दिवंगत विलासकाकांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे या मतदार संघातून दावेदार आहेत. त्यांचा शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी समन्वय आहे. उंडाळकरांनी जिल्हा बँक प्रगतीपथावर ठेवण्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन उदयसिंह पाटील यांना सत्ताधारी पॅनेलमध्ये सामावून घेतल्यास सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कोणती भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कृषी प्रक्रिया संघातील (खरेदी-विक्री संघ) बहुतांश मते ही राष्ट्रवादीची आहेत. या मतदार संघातही सहकार मंत्र्यांनी चाचपणी केली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी कराड सोसायटी मतदार संघातून लढण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हा मतदार संघ कळीचा ठरणार आहे.

सहकार मंत्र्यांचे मतदारांना पत्र...

मी निवडणूक लढवू इच्छित आहे. आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील विकास सेवा सहकारी संस्था या गटात मतदार आहात. मी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून कार्यरत आहे. मला शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. या माध्यमातून मी जनसेवेसाठी प्रयत्नशील आहे. आपल्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य होत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मला आपला पाठिंबा व सहकार्य मिळावे. दरम्यानच्या काळात मी आपल्या समक्ष भेटीसाठी येणार आहे, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी मतदार संघातील मतदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - सातारा : 'आबासाहेब वीर पुरस्कार' डॉ. बाबा आढाव यांना जाहीर ; हसमुख रावल यांना 'प्रेरणा पुरस्कार'

हेही वाचा - कृषीतज्ञ, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.