सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 हजार 188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.
साता-यात वाढ कायम -
कोरोनाबाधितांमध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक 309 रुग्ण आढळले. तर जावळीत 13, कराड 209, खंडाळा 65, खटाव 177, कोरेगाव 126, माण 78, महाबळेश्वर 20, पाटण 102, फलटण 35, वाई 43 व इतर 11 असे बाधित तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 74 हजार 590 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 10 हजार 241 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 188 बाधित निघाले. आजचा पॉझिटिव्हीटी दर 11.60 टक्के इतका आहे.
15 हजार 467 रुग्ण अॅक्टिव्ह -
मृत्यू झालेल्यांमध्ये जावळी 2, कराड 9, खटाव 2, कोरेगाव 2, माण 5, फलटण 3, सातारा 11, वाई 2 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 864 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 15 हजार 467 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
1 हजार 110 नागरिकांना डिस्चार्ज -
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1 हजार 110 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 55 हजार 258 नागरिक या आजारातून बरे झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोना वाढ कायम.. जिल्ह्यात 1 हजार 188 नवे पॉझिटिव्ह, 36 रुग्णांचा मृत्यू - सातारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या
सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 हजार 188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.