ETV Bharat / state

Satara Suicide News : साताऱ्यात नवविवाहित तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून आत्महत्या

author img

By

Published : Jun 23, 2023, 1:10 PM IST

दोनच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरूणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय २२), असे त्याचे नाव आहे. पाटण तालुक्यातील करपेवाडी गावात ही घटना घडली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

सातारा - दोनच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरूणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे घडली आहे. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय २२), असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले होते.

पत्नी गेली होती माहेरी - पाटणच्या ढेबेवाडी खोऱ्यातील करपेवाडी गावचा रहिवासी असलेला स्वप्नील करपे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याचे वडील व मोठा भाऊ कामानिमित्ताने मुंबईला असतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी मुंबईला गेली गेली असताना स्वप्नीलने आत्महत्या केली. या घटनेमुळे ढेबेवाडी खोऱ्यात खळबळ उडाली आहे.

श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या - रात्री घरी आई व स्वप्नील असे दोघेच होते. स्वप्नीलने खोलीत झोपायला गेल्यावर मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो फोटो ठेवला. लवकरच ह्या फोटोला हार चढणार आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. माणसांसाठी आता बस्स,नाय जमणार पुढे आयुष्य काढायला आणि नाय ह्या फोटोला हार चढला तर मला... भावपूर्ण श्रद्धांजली! असा मजकूर लिहिला.

स्टेट्स पाहून मित्रांची धाव - स्टेट्स पाहून मित्रांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्याच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने हाका मारल्या. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांनी खिडकीतून पाहिले असता स्वप्नीलने गळफास घेतल्याचे दिसते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. स्वप्नीलच्या आत्महत्येचा कुटुंबीय आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे.

हेही वाचा -

  1. Nashik Crime News : मध्यरात्री रेल्वे स्थानकावर थांबणे पडले महागात; विवाहितेवर अत्याचार
  2. Ahmednagar Crime News: धक्कादायक! पाथर्डी येथील एकाच विहिरीत आढळले चार मृतदेह; मृतांमध्ये आईसह तीन मुलांचा समावेश
  3. Police Bribery Case: बीड जिल्ह्यात दोन दिवसात दोन पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.