ETV Bharat / state

Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? सूचक वक्तव्याने चर्चांना पुन्हा उधाण - Big Statement of NCP MP Dr Amol Kolhe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अगोदर आभाळ बघायचं, वारं बघायचं मग नंतर नांगरायचं, असे म्हणत लोकसभा निवडणूक लढवायची का? कोठून लढवायची? कशी लढवायची हे वारे बघून ठरवायचे, असे सूचक विधान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

Amol Kolhe
खासदार डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Apr 15, 2023, 9:22 AM IST

Updated : Apr 15, 2023, 9:46 AM IST

खा. अमोल कोल्हेंचे आगामी निवडणुकीबद्दल मोठे वक्तव्य

सातारा: सध्या शेतकरी कुठे शेतात दिसतोय का? असा सवाल करत 'अगोदर आभाळ बघायचं.. वारं बघायचं.. मग नांगरायचं असतं, असे खा. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील कराडमध्ये होणाऱ्या शिवपुत्र संभाजी महानाट्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच अमोल कोल्हेंनी मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी तुमचे सभागृहात कौतुक केल्याकडे लक्ष वेधून आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, असा प्रश्नावर विचारला असता खासदार कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी माझे कौतुक केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी देखील मोदींचे कौतुक केले. त्यामुळे आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

राष्ट्रवादीमुळे खासदार झालो: माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला राष्ट्रवादीमुळे खासदार होता आले, असे अमोल कोल्हेंनी सांगितले. खासदार झाल्यानंतर शरद पवारांचा सहवास लाभला. तब्बल साडेपाच दशके ते राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना मला बरेच काही शिकायला मिळत आहे. त्यांच्याकडे मोठी ऊर्जा आहे, असेही कोल्हे म्हणाले. तसेच डॉ. कोल्हे म्हणाले की, शाश्वत विकासाकडे जाणाऱ्या राजकारणावर आपला विश्वास आहे. मी शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतो. चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्गांचे काम सध्या माझ्या मतदारसंघात होत आहे. सात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स होत आहेत.

याआधीही असेच विधान: यापूर्वीही अमोल कोल्हे यांनी असेच विधान केले होते. आभाळ पाहून, वारं पाहून, मगच नांगरायला घ्यायचे असते, असे त्यांनी म्हटले होते. तेव्हाही कोल्हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कोल्हे यांनी आता पुन्हा तसेच विधान केले आहे. कोल्हे यांनी दुसऱ्यांदा तेच विधान केल्याने त्यांच्या मनात काय चालले आहे? असा सवाल केला जात आहे.

हेही वाचा: MP Amol Kolhe शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावा याकरता भगवा जाणीव आंदोलन छेडणार खासदार डॉअमोल कोल्हे

Last Updated : Apr 15, 2023, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.