ETV Bharat / state

भाजपचे नवनियुक्त खासदार नाईक-निंबाळकरांनी काढली स्वपक्षीय नेत्यांचीच लायकी

author img

By

Published : Jun 23, 2019, 7:43 PM IST

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निंबाळकरांना आमदार जयकुमार गोरेंची संगत सोडण्याचा सल्ला दिला होता.

खासदार नाईक-निंबाळकरांनी भाजप नेत्यांचीच काढली लायकी

सातारा - लायकी आणि माहिती नसणारे काही महाभाग पाणी आणण्याची भाषा करुन जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र, असे कितीही 'लुंगे-सुंगे' एकत्र आले, तरी हिंदकेसरी जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची त्यांची लायकी नाही, असे वक्तव्य करत माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेते आणि माजी आमदार दिलीप येळगावकरांसह अनिल देसाई यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.

आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेच्या जॅकवेल पंप हाऊसचे सर्वेक्षण आणि अन्वेक्षण विभागाच्या कामाचे शनिवारी भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळी खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निंबाळकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात कोणी काय उद्योग केले, हे बाहेर काढणार आहे. त्यामुळे निंबाळकर यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या कामावर अविश्वास व्यक्त केला आहे. परिणामी त्यांच्या या भूमिकेमुळे नवा वाद पेटला आहे.

खासदार पक्षाविरोधात काम करणार का?

येत्या 3 महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. आमदार जयकुमार गोरे तुर्तास काँग्रेसमध्ये आहेत. निंबाळकरांनी माणमधून तिकीटाची खात्री दिल्यास ते भाजपमध्ये उडी मारतील. परंतु, तिकीट नाही मिळाले तर निंबाळकरांना गोरेंचा पैरा फेडावा लागेल, त्यानुसार ते पक्षाच्या विरोधात जाऊन गोरेंचे काम करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

पक्षश्रेष्ठींकडे खासदारांची तक्रार -

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निंबाळकरांना आमदार जयकुमार गोरेंची संगत सोडण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा निंबाळकरांनी त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. त्याचा वचपा खासदारांनी या कार्यक्रमातून काढल्याचे मानले जात असले तरी खासदारांच्या वक्तव्याने भाजपचे नेतेच नव्हे तर निष्ठावंत कार्यकर्तेही दुखावले गेले आहेत. त्यामुळे यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Intro:सातारा:- माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल आंधळी धरणात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांची पाठराखण करताना विरोधकांवर ‘लुंगे-सुंगे’, अशा शब्दांत केलेल्या टीकेमुळे नवा वाद पेटला आहे. त्यांच्या टीकेचा रोख माणमधील भाजप नेत्यांवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निंबाळकरांच्या स्वपक्षीय नेत्यांवरच आरोप केल्याने निष्ठावंत भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेच्या जॅकवेल पंपहाऊसचे सर्वेक्षण आणि अन्वेक्षण विभागाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.Body:‘लायकी आणि माहिती नसणारे काही महाभाग पाणी आणण्याची भाषा करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत. असे कितीही लुंगे, सुंगे एकत्र आले तरी हिंदकेसरी जयकुमार गोरे यांच्या रविरोधात लढण्याची त्यांची लायकी नाही’, असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे भाजप नेते माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांच्यावर तोफ डागली. शिवाय माझ्या लोकसभा निवडणुकीत कोणी काय उद्योग केले हे बाहेर काढणार असल्याचेही जाहीर करत स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या कामावर अविश्‍वास व्यक्त केल्याने नवा वाद पेटला आहे.

खासदार पक्षाविरोधात काम करणार का?
येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. आमदार जयकुमार गोरे तुर्तास काँग्रेसमध्ये आहेत. निंबाळकरांनी माणमधून तिकीटाची खात्री दिल्यास ते भाजपमध्ये उडी मारतील. परंतु, तिकीट नाही मिळाले तर निंबाळकरांना गोरेंचा पैरा फेडावा लागेल. त्यानुसार ते पक्षाच्या विरोधात जाऊन गोरेंचे काम करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी होणार
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निंबाळकरांना आमदार जयकुमार गोरेंची संगत सोडण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा निंबाळकरांनी त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. त्याचा वचपा खासदारांनी या कार्यक्रमातून काढल्याचे मानले जात असले तरी खासदारांच्या वक्तव्याने भाजपचे नेतेच नव्हे तर निष्ठावंत कार्यकतेर्र्ही दुखावले गेले असून यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.