ETV Bharat / state

सातारा : खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा - सूर्यकांत अहिरे

साताऱ्यात ५ वर्षापूर्वी राजवाड्यावर शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून प्रकाश सणस याने सूर्यकांत अहिरे याचा खून केला होता. याप्रकरणी सणसला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:13 PM IST

सातारा - राजवाडा परिसरात गाडी मागे घेण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून प्रकाश रामचंद्र सणस याने सूर्यकांत उर्फ सुरेश पांडुरंग अहिरे याचा ५ फेब्रुवारी २०१४ रोजी खून केला होता. याप्रकरणी सणसला आज जिल्हा न्यायाधीश आर.डी सावंत यांनी जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सूर्यकांत अहिरे (चिमणपुरा पेठ, सातारा) यांचे मित्र शंकर जांभळे यांची आरोपी प्रकाश सणस (३४, सातारा) यांच्यासोबत गाडी मागे घेण्यावरून वादावादी झाली होती. यावेळी अहिरे यांनी सणसच्या कानाखाली चापट मारली. यानंतर सणस घरी गेला आणि घरातून चाकू घेऊन तो परत सायंकाळी पावणेपाच वाजता राजवाड्यावर आला. यावेळी सुर्यकांत हा मित्रांसोबत गप्पा मारत असताना सणसने त्यांच्यावर चाकूचा हल्ला करण्यास सुरुवात केली. डोक्यात पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर काही वेळातच आरोपीला पोलिसांनी अटक केली. या सुनावणी दरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सणसला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Intro:सातारा राजवाडा परिसरात गाडी मागे घेण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादात सूर्यकांत उर्फ सुरेश पांडुरंग आहिरे (चिमणपुरा पेठ, सातारा) यांचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी प्रकाश रामचंद्र सनस (वय 34) ता. सातारा याला जिल्हाप्रमुख न्यायाधीश आर.डी सावंत यांनी जन्मठेप व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Body:याबाबतची अधिक माहिती अशी की 5 फेब्रुवारी 2014 सली सूर्यकांत अहिरे यांचे मित्र शंकर जांभळे यांची आरोपी प्रकाश सणस यांच्यासोबत गाडी मागे घेण्यावरून वादावादी झाली होती. यावेळी सूर्यकांत आहिरे यांनी आरोपीच्या कानाखाली चापट मारली होती. या प्रकरणानंतर सणस घरी गेल्यावर घरातून चाकू घेऊन तो परत सायंकाळी पावणेपाच वाजता राजवाड्यावर आला. त्यावेळी सुरेश मित्रांसोबत गप्पा मारत होते. अचानक सणसने त्यांच्यावर चाकूचा हल्ला करण्यास सुरुवात केली. डोक्यात पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळातच आरोपीला पोलिसांनी अटक केली गेली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी प्रकाश सणसला जन्मठेप आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.