कराड (सातारा) - शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून मलकापूर नगरपालिकेने 24 बाय 7 जनआरोग्य तपासणी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ कराडचे अमरदिप वाकडे, डीवायएसपी सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत झाला.
मलकापूर शहर कोरोनामुक्त राहण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरामधील 60 वर्षावरील नागरिक व 10 वर्षांच्या आतील मुलांचा सर्व्हे करण्याचे निर्देश पुणे विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार नगरपालिकेने सर्वेक्षण पूर्ण केले आहे
तसेच नगरपालिकेने 24 बाय 7 जनआरोग्य तपासणी अभियान हाती घेतले आहे. यामुळे आजारी नागरिकांचे निदान होईल आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील. जेणेकरून कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.