ETV Bharat / state

सौर ऊर्जेसाठी संकलित करात 10 टक्के सूट देणारी मलकापूर एकमेव नगरपालिका

मलकापूर नगरपालिकेने सौर ऊर्जेचा वापर करणार्‍या मिळकतधारकांना संकलित करात 10 टक्के सूट दिलेली आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन धोरणानुसार चार्जिंग स्टेशन उभारणार्‍या स्थानिक नागरी संस्थांतील नागरिक, गृहनिर्माण संस्थांना देखील मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ि
ि
author img

By

Published : Sep 11, 2021, 10:10 PM IST

कराड (सातारा) - सौर ऊर्जेचा वापर (सोलर वॉटर हिटर व सौर दिवे) करणार्‍या मिळकतधारकांना संकलित करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णय मलकापूर ही राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली आहे.

मलकापूर नगरपालिकेने सौर ऊर्जेचा वापर करणार्‍या मिळकतधारकांना संकलित करात 10 टक्के सूट दिलेली आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन धोरणानुसार चार्जिंग स्टेशन उभारणार्‍या स्थानिक नागरी संस्थांतील नागरिक, गृहनिर्माण संस्थांना देखील मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे. स्वत:च्या इलेक्ट्रीक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात 2 टक्के, गृहनिर्माण संस्थांमध्ये सामुदायिक चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ता करात 5 टक्के आणि गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्वावर चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या जागेसाठी व्यापारी दराऐवजी घरगुती दराने आकारणी करण्याचाही निर्णय मलकापूर नगरपालिकेने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाची मलकापूर नगरपालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. हा निर्णय घेऊन प्रत्यक्ष अमंलबजावणी करणारी मलकापूर ही राज्यातील एकमेव नगरपालिका आहे. मिळकतधारक आणि गृहनिर्माण संस्थांनी सौरऊर्जेचा (सोलर वॉटर हिटर व सौर दिवे) वापर करून संकलित आणि मालमत्ता करामधील सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा - कोयना धरणातील पाणीसाठा 100 टीएमसी पार, तीन महिन्यांत 5 हजार मिलीमीटर पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.