ETV Bharat / state

तडीपारच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यास अटक, कराड पोलिसांची कारवाई  - Satara latest news

हद्दपार केले असताना ओगलेवाडी परिसरात फिरणार्‍या शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी याला कराड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

तडीपारच्या आदेशाचे उल्लंघन
तडीपारच्या आदेशाचे उल्लंघन
author img

By

Published : May 2, 2021, 2:08 PM IST

कराड (सातारा) - सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले असताना ओगलेवाडी परिसरात फिरणार्‍या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी असे त्याचे नाव आहे. कराड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी ही कारवाई केली. हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी यास 31 मार्चपासून एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असताना तो ओगलेवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार तानाजी शिदे व मारुती लाटणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे,पोलीस नाईक तानाजी शिंदे, मारुती लाटणे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास कराड शहर पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही बी. आर. पाटील यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.