ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान घाटाईची देवराई - सातारा जिल्हा लेटेस्ट न्यूज

जागतिक निसर्ग वारसास्थळ असलेल्या कास पठारालगतची देवराई शेकडो प्रकारच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. ही देवराई ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक पिढ्यानपिढ्या जपली आहे. शंभराहून अधिक दुर्मिळ आणि लुप्तप्राय वनस्पती असलेल्या या स्थळाचा विकास केल्यास, पक्षी निरीक्षकांबरोबरच कास परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास पक्षी अभ्यासक डॉ. जितेंद्र कात्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

घाटाईची देवराई
घाटाईची देवराई
author img

By

Published : May 22, 2021, 6:05 PM IST

सातारा - जागतिक निसर्ग वारसास्थळ असलेल्या कास पठारालगतची देवराई शेकडो प्रकारच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. ही देवराई ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक पिढ्यानपिढ्या जपली आहे. शंभराहून अधिक दुर्मिळ आणि लुप्तप्राय वनस्पती असलेल्या या स्थळाचा विकास केल्यास, पक्षी निरीक्षकांबरोबरच कास परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास पक्षी अभ्यासक डॉ. जितेंद्र कात्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.

'गणेशगुडीचा आदर्श ठेवावा'

आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने साताऱ्यातील पक्षी अभ्यासकांनी घाटाईच्या देवराईकडे वन विभागाचे लक्ष वेधले आहे. पक्षी अभ्यासक डॉ. जितेंद्र कात्रे म्हणाले, "कर्नाटकात बेळगावजवळ गणेशगुडी हे गाव आहे. तेथील जंगलात कर्नाटक शासनाने पाण्याचे हौद निर्माण केले. काही महिन्यानंतर पाण्याच्या आशेने तेथे पक्षी आकर्षित झाले. आज तिथं जंगलात एरवी न दिसणा-या विविध रंगांच्या हजारो पक्ष्यांचा अधिवास आहे. पक्षी निरीक्षकांसाठी निरीक्षण मनो-यांसारख्या विविध सुविधा निर्माण केल्याने पर्यटकांची सोय झाली आहे. याच धर्तीवर कास पठाराजवळच्या घाटाई देवराईचा विकास करावा.

दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान घाटाईची देवराई

पक्ष्यांसाठी अनुकूल वस्तिस्थान

साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले की, "जांभूळ, हिरडा, उंबर, ऐन आदी पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांचे प्रमाण याठिकाणी विपुल असल्याने, घाटाईच्या देवराईत विविध जातीचे पक्षी वास्तव्य करतात. येथे पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित केल्यास जैवविविधता जपण्या बरोबरच पर्यटन विकासाला निश्चितच चालना मिळेल."

पाच हेक्टरमध्ये विस्तार

महाराष्ट्रात सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळुबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देव-देवतांच्या नावाने त्या ओळखल्या जातात. सातारा जिल्ह्यात काळुबाई, आरव, घाटाई आदी 29 देवरायांची नोंद आहे. कास पठारालगत, साताऱ्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर घाटाई देवस्थान आहे. या डोंगरावर, एका छोट्या टेकडीवर सुमारे पाच हेक्‍टर क्षेत्रात ही देवराई घाटवण ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक वाडवडिलांच्या काळापासून जपली आहे.

घाटाईची जैवविविधता

जैवविविधतेचा केंद्रबिंदू असलेल्या कास पठारापासून अवघ्या तीन किलोमीटरवर ही देवराई असल्याने याठिकाणी जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. सुमारे शंभराहून जास्त दुर्मिळ आणि लुप्तप्राय वनस्पती या देवराईत असल्याचे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक शेखर मोहिते यांनी सांगितले. या देवराईत जांभूळ, पिसा, गेळा, अंजनी आदी वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. ही देवराई स्थानिकांनी देवीच्या नावाने जतन केलेले संरक्षीत क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, कीटक तेथे आश्रयाला आहेत. कित्येक दुर्मिळ प्राणी, पक्षी हे देवराईच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडूळ यांच्या जाती येथे सापडतात, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

'औषधी वनस्पतींचे भांडार'

या देवराईत उंचउंच वृक्ष, जाडजूड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर पसरलेल्या महालता, पाचोळ्याचा ढिग, त्यातून धावणारे विविध प्राणी आणि दुर्मिळ पक्षी आढळून येतात. हे दृष्य नेहमीच इथे पाहायला मिळते. घाटाई म्हणजे अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ श्रीरंग शिंदे यांनी दिली.

कुऱ्हाडबंदीला धार्मिक अधिष्ठान

देवराई ही बहुदा देवळाभोवती असते. या देवरायांमध्ये झाडावरचे फुलही निसर्गत:च खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराईतील झाड अथवा ओली फांदी जरी तोडल्यास देवीला ते चालत नाही, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धन व कुऱ्हाडबंदीला धार्मिक अधिष्ठान मिळाले आहे. देवराईमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.