ETV Bharat / state

साताऱ्यात दहा लाखांचा गुटखा जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Apr 6, 2021, 3:01 PM IST

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये छापा मारून, विविध कंपन्यांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी असा दहा लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शाहरूख उर्फ मुबीन अस्लम बागवान (रा. बुधवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यात दहा लाखांचा गुटखा जप्त
साताऱ्यात दहा लाखांचा गुटखा जप्त

सातारा - स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये छापा मारून, विविध कंपन्यांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी असा दहा लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शाहरूख उर्फ मुबीन अस्लम बागवान (रा. बुधवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मुबीन बागवान हा आपल्या घरात गुटख्याचा साठा करून ठेवणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बागवान याच्या घराच्या परिसरात सापळा लावला. बागवान याने वाहन क्रं. (एमएच 42 सी 4519) मधून विविध कंपनीचा गुटखा आणल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावार छापा टाकला.

26 पोते गुटखा, 13 पोते तंबाखू जप्त

या छाप्यात पोलिसांना 26 पोते गुटखा व 13 पोते तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी छाप्यात सापडलेला गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी गाडी असा सुमारे 10 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याला पुढील कारवाईसाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.

हेही वाचा - 100 कोटी वसुली प्रकरण, सीबीआयचे पथक येणार मुंबईत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.