सातारा - उदयनराजे भोसले नाव ऐकले की भल्याभल्यांना भेटायचा मोह आवरत नाही. मग तो कोणीही असो, विरोधक सुद्धा महाराजांना साहेब म्हणून बोलवतात. मात्र, आता तर परदेशी पाहुणे देखील महाराजांना भेटण्यासाठी तसेच बोलण्यासाठी उत्सुक आहेत. हे एका व्हिडिओमधून समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी हॉटेल महाराजा येथे बैठक आवरून गाडीत बसताना एका परदेशी पाहुण्यांनी महाराजांची भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महाराजांनी कशाप्रकारे पाहुण्याची पाहुणचार केला. तसेच विचारपूस करून आपल्या शैलीत त्याचा मान सन्मान केला हे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या मित्राला सांगून लगेच याची माहिती दिली व पाहुण्यांची राहण्याची व फिरण्याची सोय करून दिली.