सातारा - कोरेगाव तालुक्यातील साप गावात बेकायदेशीरपणे बैलगाड्यांची शर्यत भरवल्या प्रकरणी दोन आयोजकांसह सोळा जणांविरुद्ध रहिमतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यावेळी घटनास्थळावरून दोन शर्यतीचे छकडे, सात बैल, तीन दुचाकी आणि एक पिकअप असा सुमारे दोन लाखांचा मुद्दमाल घटनास्थळावरून ताब्यात घेतला आहे.
साप गावात बैलगाड्यांची शर्यत आयोजीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी बैलगाड्यांची शर्यत सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी दोन आयोजकांसह 14 लोकांवर गुन्हा दाखल केला.
विजय अशोक कदम, अरविंद भगवान कदम, आशिष श्रीमंत जाधव, अनिकेत दत्तात्रय पोळ, प्रसाद दत्तात्रय पवार, विक्रम अंकुश टिके, अतुल शशिकांत पिसाळ, अजिक्य यशवंत सुळके, शुभम संजय कदम, विष्णु रामराव फडतरे, प्रदिप विष्णु फडतरे, हरिदास चंद्रकांत मोरे, अर्जुन सुधीर मोरे, अक्षय रविंद्र मोरे, विपुल दिलीप कदम व अनुराग कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.