ETV Bharat / state

सात‍ाऱ्यातील ११ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह, तर नऊ जण नव्याने दाखल - सातारा जिल्हा रुग्णालय

जिल्ह्यामधील ११ जण कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परदेशातून प्रवास करून आलेले ७ प्रवासी, इस्लामपूर येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले २ व इतर २ असे एकूण ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.

Corona suspect
सात‍ारमधील ११ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटीव्ह तर नऊ जण नव्याने दाखल
author img

By

Published : Mar 31, 2020, 11:42 PM IST

सातारा - जिल्ह्यामध्ये परदेश दौरे करून आलेले २ प्रवासी तसेच इस्लामपूर येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील दोघे कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये ५ जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यामधील ११ जण कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परदेशातून प्रवास करून आलेले ७ प्रवासी, इस्लामपूर येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले २ व इतर २ असे एकूण ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे गडीकर यांनी सांगितले.

३१ मार्चअखेर सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी -

1. एकूण दाखल - ५३
2. जिल्हा शासकीय रुग्णालय- ४६
3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- ८
4. कोरोना नमुने घेतलेले-५३
5. कोरोना बाधित अहवाल - २
6. कोरोना अबाधित अहवाल - ४५
7. अहवाल प्रलंबित - ६
8. डिस्चार्ज दिलेले- ४५
9. सद्यस्थितीत दाखल- ८
10. आलेली प्रवासी संख्या (३० मार्च) - ५०४
11. होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्ती - ५०४
12. होम क्वारंटाईनपैकी १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - ३२०
13. पैकी १४ दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – १८४
14.संस्थेमध्ये विलगीकरण केलेले- १८१
15. यापैकी डिस्चार्ज केलेले- १०
16. अद्याप दाखल - १७१

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.